Satyamev Jayate 2 Song: 'सत्यमेव जयते 2' सिनेमातील 'तेनु लगंगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, जॉन आणि दिव्या थिरकणार
Satyamev Jayate 2 Song: 'सत्यमेव जयते 2' सिनेमातील 'तेनु लगंगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जॉनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीखदेखील जाहीर केली आहे.
Satyamev jayate 2 Song: 'सत्यमेव जयते 2' सिनेमात दिव्या खोसला कुमारदेखील (Divya Khosla Kumar) दिसून येणार आहे. सिनेमातील 'तेनु लगंगा' गाणे नुकतेच निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे. जॉन अब्राहमने (John Abraham) ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीखदेखील जाहीर केली आहे. त्याने गाण्यातील काही स्निपेट्स पोस्ट करत त्या व्हिडीओला कॅप्शन लिहिले आहे,"या दिवाळीत डान्स फ्लोअरवर पटाका बनवा". 'सत्यमेव जयते 2' सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लग्नसोहळ्याची पाश्वर्भूमी असलेल्या या गाण्यात जॉनसोबत दिव्या नाचताना दिसून येत आहे. हे गाणे एका पंजाबी गाण्याचा रिमेक आहे. या गाण्याचे बोल जस मानक यांनी लिहिले आहेत. मूळ ट्रेकने यूट्यूबवर 1.4 अब्ज व्यूज मिळवले होते.
रितेश-जिनिलियाची भन्नाट लव्हस्टोरी, दहा वर्ष डेट अन् लग्नाच्या दोन दिवस आधी हटके प्रपोज...
तनिष्क बागने जस मानकच्या मदतीने या गाण्याची नव निर्मिती केली आहे. तनिष्कने या गाण्याव्यतिरिक्त आणखी काही गाणीदेखील लिहिली आहेत. त्यामुळे या सिनेमात तनिष्क गीतकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Annaatth Movie Box Office: रजनीकांतच्या 'अन्नात्थे' चा विक्रम, अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टपा पार
'सत्यमेव जयते 2' सिनेमाचे दिग्दर्शन मिलन मिलाप जावेरी यांनी केले आहे. तर 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'सत्यमेव जयते' सिनेमाचाच 'सत्यमेव जयते 2' हा पुढचा भाग असणार आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जाणून घ्या सिनेमा कधी प्रदर्शित होणार
'सत्यमेव जयते 2' सिनेमा 'सत्यमेव जयते' सिनेमाचाच पुढचा भाग असणार आहे. यात जॉनने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका स्विकारली आहे. प्रेक्षक या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिव्या संघर्ष करताना दिसून येणार आहे. 2018 साली प्रदर्शित झालेला 'सत्यमेव जयते'देखील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा होता. तर 'सत्यमेव जयते 2' मध्ये भ्रष्टाचार अधिक विस्तारात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.