Sooryavanshi Box Office : अक्षय-रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’चा बॉक्स ऑफिसवर धमका, पहिल्या दिवशी बक्कळ कमाई
Sooryavanshi Box Office : अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचा बहुप्रतिक्षीत ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट शुक्रवारी तिकिटखिडकीवर आला.
Sooryavanshi Box Office : अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचा बहुप्रतिक्षीत ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट शुक्रवारी तिकिटखिडकीवर आला. कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून चित्रपटगृह बंद होती. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर चित्रपटगृह सुरु झाली आहेत. त्यानंतर सूर्यवंशी चित्रपट तिकिटखिडकीवर आला आहे. अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीच्या या चित्रपटानं आपेक्षाप्रमाणे मोठी कमाई केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सूर्यवशींची चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास तीस कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे
#MovieReview: #Sooryavanshi is a SURE-SHOT SMASH HIT... #AkshayKumar terrific, #AjayDevgn and #RanveerSingh sone pe suhaaga... #RohitShetty presents a Blockbuster package this #Diwali... My detailed review on #BollywoodHungama... #SooryavanshiReview: https://t.co/Pz7QEesapm pic.twitter.com/MJAA5zt5Yk
— taran adarsh (@taran_adarsh) November 5, 2021
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ अभिनित सूर्यवंशी हा चित्रपट देशभरात जवळपास चार हजार पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज झाला आहे. तर जगभरात 5200 स्क्रीनवर हा चित्रपट रिलीज झालाय. बॉक्स ऑफिसवरील सूर्यवंशी चित्रपटाची कमाई पाहाता कोरोना महामारीतून सावरण्यासाठी चित्रपटश्रृष्टीला मोठा फायदा मिळेल, असं म्हटलं जातेय.
View this post on Instagram
सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबरला (शुक्रवारी) हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह यात अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही विशेष भूमिका असून हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झालाय आहे.
प्रदर्शित होण्यापूर्वीच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला...
अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' चित्रपटानं प्रदर्शित होण्यापूर्वीच 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा 'सूर्यवंशी' आज देशभरातल्या 5 हजारां पेक्षा जास्तं स्क्रीन्सवर प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाचे ओटीटी हक्क 200 कोटींना विकले गेलेत तर, म्युझिकचे हक्क विकून 60 कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी 200 कोटी रुपये इतका खर्च आल्याचं बोललं जातं असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय.