Deepika Padukone Celebrating Om Shanti Om : 'ओम शांती ओम' ची 14 वर्षे; दीपिकाने शेअर केली खास पोस्ट
Deepika Padukone Celebrating 'Om Shanti Om' : 9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते.
Deepika Padukone Celebrating 'Om Shanti Om' : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. दीपिका तिच्या चित्रपटांबद्दलच्या पोस्ट शेअर करत असते. ओम शांती ओम (Om Shanti Om) या चित्रपटामधून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये दीपिकाने शांती ही भूमिका साकारली होती. दीपिकाबरोबरच शाहरूख खान, श्रेयस तळपगदे आणि अर्जुन रामपाल यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या होत्या.
ओम शांती ओम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 14 वर्षपूर्ण झाली आहेत. 9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. चित्रपटाच्या कथानकाला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ओम शांती ओम चित्रपटाला 14 वर्ष पूर्ण झाल्याने दीपिकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. यामध्ये शाहरूख आणि तिचा रोमॅंटिक अंदाज दिसत आहे. चित्रपटातील आयकॉनिक सिनचा हा फोटो आहे.
View this post on Instagram
लवकरच दीपिका कबीर खान यांच्या 83 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच तिचा पठाण चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिकासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'द इंटर्न' या दीपिकाच्या आगामी चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहणार आहे. छपाक, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या दीपिकाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.