एक्स्प्लोर
बाळासाहेबांच्या जयंतीला 'सरकार 3' चा टीझर

मुंबई : राम गोपाल वर्मा यांच्या आगामी 'सरकार 3' या मच-अवेटेड सिनेमाचा टीझर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी रिलीज होणार आहे. बाळासाहेबांच्या आयुष्यावरुन प्रेरित होऊन या सिनेमाचं कथानक रंगवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 23 जानेवारी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंती दिनी या सिनेमाची पहिली झलक पाहायला मिळेल.
2005 साली राम गोपाल वर्माचा 'सरकार' सिनेमा प्रसिद्ध झाला होता. यामधील महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारलेली सुभाष नागरेची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्वाशी मिळती-जुळती होती. त्यानंतर 2008 साली 'सरकार राज' प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याही होती. तर आताच्या म्हणजे तिसऱ्या भागात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आधीच्या रुबाबात दिसतील.
महानायक अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला 'सरकार 3' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतील, यात शंका नाही.
राम गोपाल वर्मा नेहमीच खऱ्या-खुऱ्या व्यक्तिरेखांवरुन सिनेमे बनवत असतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी माहिती दिलीय की, 'शशीकला' नावाचं फिल्म टायटल रजिस्टर केलं आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर हा सिनेमा आधारित असण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
