Sara Ali Khan : सारा अली खान करतेय 'या' व्यक्तीला डेट? ज्याची आहे कोट्यवधीची संपत्ती
Sara Ali Khan Affair : अभिनेत्री सारा अली खान कोणालातरी डेट करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या प्रकरणी सारा अली खानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Sara Ali Khan Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) अलिकडेच तिच्या 'लुकाछुपी 2' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आली होती. सारा आता पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र, या चर्चेच कारण काहीस वैयक्तिक आहे. सारा अली खान चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ती सध्या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याचे बोललं जातंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान असिस्टंट डायरेक्टर जेहान हांडाला (Jehan Handa) डेट करत आहे. जेहान हांडी 250 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. संपत्तीबाबत बोलायचे झाले तर सर्वांनाच माहित आहे की, सारा एका पतौडी कुटुंबातील आहे. साराचे वडिल बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पतौडी कुटुंबातील आहे. सैफ अली खानच्या संपत्तीवर नजर टाकली तर त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, यामागील कारण देखील त्याच्या वडिलांकडून मिळालेली संपत्ती आहे.
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खान आणि जिहान हांडा एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. सारा अली खान आणि जिहान हांडा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. केदारनाथच्या शूटिंगदरम्यान या दोघांची भेट झाल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्री सारा अली खानच्या डेटींगच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या प्रकरणी सारा अली खानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सारा अली खानने 2018 मध्ये 'केदारनाथ' (Kedarnath) चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. लवकरच साराने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावरही सारा अली खानचा मोठा चाहतावर्ग आहे. अलिकडेच सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुषचा 'अतरंगी रे' (Atrangi Re) सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात साराने रिंकूची भूमिका साकारली होती. सिनेमाची कथा आणि साराच्या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. सैफ अली खानला साराचा 'अतरंगी रे' सिनेमा पाहताना अश्रू अनावर झाले होते.
संबंधित बातम्या :
- Tiger 3 Release Postponed : टायगर 3 चित्रपटावर कोरोनाचं सावट, शूटींग रद्द
- आमिर अली आणि संजीदा शेखचा घटस्फोट, लग्नाच्या 9 वर्षानंतर विभक्त
- Truth Social App : ट्रम्प यांचा आणखी एक उद्योग, फेब्रुवारी महिन्यात येणार ट्विटरला टक्कर देणारा अॅप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha