Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीला पाकिस्तानातून प्रेम, म्हणाले, 'ही वेब सीरिज दोघांना जोडणारी एक दुवा'
Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेब सिरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या या सीरिजचं सगळीकडे कौतुक होत आहे.
Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची बहुप्रतिक्षित असलेली हिरामंडी:द डायमंड बाजार ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मागील अनेक दिवसांपासून या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजला जितकं भारतातून प्रेम मिळतंय, तितकंच सीमेपलीकडूनही प्रेम मिळत असल्याचं चित्र आहे.
पाकिस्तानातून देखील या सीरिजला प्रेम मिळत असल्याचं संजय लीला भन्साळी यांनी 'इंडिवायर' या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. तसेच ही सीरिज तिथल्या प्रेक्षकांच्या का पसंतीस उतरतेय, याचं देखील स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिलं आहे. दरम्यान हिरामंडी ही सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली.
आपण अजूनही एकच - संजय लीला भन्साळी
यावर संजय लीला भन्साळी यांनी म्हटलं की, 'मला पाकिस्तानकडूनही या सीरिजसाठी खूप प्रेम मिळालं. लोक या वेब सीरिजची आतुरतेने वाट पहात होते. भारत जेव्गा अविभाजित होता, तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यामुळे यांना जोडणारी ही वेब सीरिज एक दुवा आहे. ही सगळी आपली माणसं आहेत. दोन्ही देशांमधले लोक या बेव सीरिजला तितकच प्रेम दाखवत आहेत. मला अजूनही असं वाटतं की आपण सर्व एक आहोत, आपण सर्व अनेक गोष्टींमुळे एकमेकांशी जोडलेले आहोत.'
'मला ज्यांच्याकडून प्रेम मिळतं त्यांच्याकडून ते स्वीकारायला आवडतं'
आता या गोष्टींवरुन काही लोकांना उगाच अडचणी निर्माण करायच्या आहेत. पण त्यांचा विचार सोडून दिला तर मला दोन्ही बाजूंनी प्रेम मिळतंय. प्रेक्षक आणि आमच्यामधील हा एक देवाण-घेवाणीचा भाग आहे. या वेब सीरिजमध्ये अशी काही पात्र आहेत, जी लोकांना जोडतात. म्हणूनच लोकं या पात्रांविषयी बोलत आहेत. अनेकांना ती पात्र आवडली आहेत, काहींना ती आवडली नाहीत. पण मला ज्यांच्याकडून प्रेम मिळतं त्यांच्याकडून ते स्वीकारायला आवडतं, असंही त्यांनी म्हटलं.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Raj Thackeray : 'देवेंद्र फडणवीसांना गाणं लिहिण्याची गरज आहेच', राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी