Sanjay Jadhav : संजय जाधवांनी आजोबांना ऐकवली 'तमाशा लाईव्ह'ची नांदी; व्हिडीओ व्हायरल
Sanjay Jadhav : 'तमाशा लाईव्ह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sanjay Jadhav : संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चित्रपटाची नांदी' हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. नुकतेच संजय जाधव यांनी ही नांदी त्यांच्या आजोबांना म्हणजेच शाहीर पांडुरंग कदम यांना ऐकवली आहे.
संजय जाधव यांनी शाहीर पांडुरंग कदम यांना नांदी ऐकवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून माझ्या आजोबांची लोकगीतं ऐकत होतो. प्रत्येक म्युझिक सेटिंगला आजोबांच्या गाण्यांचा रेफरेंस एकदा तरी येतोच. माझे आजोबा सेवा दलात होते. नांदी, पोवाडा, गोंधळ आणि अनेक लोकगीतं मी त्यांच्याकडूनच पहिल्यांदा ऐकली होती. आता माझ्या नवीन सिनेमाची तमाशा लाईव्हची नांदी आजोबांना ऐकवू शकलो. माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा होता".
View this post on Instagram
'तमाशा लाईव्ह' हा सिनेमा प्रेक्षकांना 24 जूनला पाहायला मिळणार आहे. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांसारखे अनेक कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना पाश्चिमात्य नृत्यासोबत महाराष्ट्राची लोककलाही अनुभवायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या