एक्स्प्लोर

Tamasha Live : 'तमाशा लाईव्ह' चा टीझर रिलीज; सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत

'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Tamasha Live : संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) या चित्रपटातील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये सिद्धार्थ म्हणतो बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार? हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना 24 जूनला मिळणार आहे. याशिवाय ‘तमाशा लाईव्ह'मध्ये सचित आणि सोनालीचा रॉकिंग डान्सही पाहायला मिळत आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.  

'तमाशा लाईव्ह'बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, '' 'तमाशा लाईव्ह'च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे. चित्रीकरणाआधी आमची अडीच महिने कार्यशाळा सुरु होती. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच या कलाकारांना व्यक्तिरेखेशी एकरूप होणे जरा कठीण जात होते. त्या व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय मिळत नसल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त होत होती.  मात्र अडीच महिन्यांनी हे चित्र पूर्णपणे पालटले.  मला आठवते, चित्रीकरण संपल्यानंतर एकदा एडिटला बसल्यावर मला सोनालीची एक लाईन सापडत नव्हती आणि ती त्यावेळी एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. मी तिला फोन केला आणि अल्पावधीतच तिने मला व्हॉट्सअपवर संपूर्ण सीन रेकॉर्ड करून पाठवला. एवढी ती त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झाली होती आणि तीच नाही तर चित्रपटातील प्रत्येक कलाकार अडीच महिन्यांनी आपापल्या व्यक्तिरेखेशी जोडले गेले होते.''  

'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, 'ज्या वेळी संजय जाधवने 'तमाशा लाईव्ह'ची संकल्पना मला ऐकवली, तेव्हाच मला यात काहीतरी अफलातून असल्याचे जाणवले. 'तमाशा लाईव्ह' या धमाकेदार नावातच खूप काही दडले आहे. जे चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना कळेलच. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची निवड ही अतिशय अचूक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर हे दिग्गज एकत्र आले आहेत. त्यामुळे हा एक खूप भव्यदिव्य असा  जागतिक पातळीचा चित्रपट आहे. संजय जाधवच्या डोक्यात काही गोष्टी पक्क्या असल्याने त्या चित्रपटात उतरवणे त्याला खूप सोपे जाते आणि त्यातूनच मग एक उत्तम कलाकृती घडते.''  

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मिती 'तमाशा लाईव्ह'ची कथा मनीष कदम यांनी लिहिली आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाण्यांचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. त्यामुळे ही म्युझिकल ट्रीट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget