(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' या मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
Sangeet Devbabhali : भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या (Bhadrakali Production) संगीत देवबाभळी (Sangeet Devbabhali) या मराठी रंगभूमीवरील नाटकाचा या वर्षीपासून मुंबई विद्यापीठीच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या मराठी विषयात समावेश करण्यात आला आहे. या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्राजक्त देशमुखने (Prajakt Deshmukh) सांभाळली आहे. या नाटकाचा बी ए अभ्यासक्रमात समावेश होणं ही मराठी नाट्यसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.
रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली यांच्यातील संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या 'संगीत देवबाभळी' नाटकाचा विद्यार्थी आता अभ्यास करणार आहेत. एकांकिकेच्या माध्यमातून हे नाटक रंगमंचावर आलं. शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. 'संगीत देवबाभळी' हे नाटक मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त नाटक आहे. या नाटकाचं दिग्गजांनीदेखील कौतुक केलं आहे.
अभ्यासक्रमात समावेश होणं हा पुरस्कार या सगळ्या पुरस्कारांपेक्षा वेगळा : प्राजक्त देशमुख
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा समावेश झाल्याने प्राजक्त देशमुख म्हणाला, 'संगीत देवबाभळी' नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमाच्या मराठी विषयात समावेश करण्यात आल्याने खूप आनंद होत आहे. आपल्या कलाकृतीला साहित्याचा दर्जा मिळणे ही खूप आनंददायी बाब आहे. आता आणखी जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. झी गौरव, मटा सन्मान, शासनाचे असे अनेक पुरस्कार या नाटकाला मिळाले आहेत. पण अभ्यासक्रमात समावेश होणं हा पुरस्कार या सगळ्या पुरस्कारांपेक्षा वेगळा आहे.
View this post on Instagram
नाटकाची घौडदौड पुढे अशीच सुरू राहुदेत : प्रसाद कांबळी
'संगीत देवबाभळी' या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी म्हणाले, "मुंबई विद्यापीठात मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि आज त्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा समावेश झाला आहे. ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. मराठी रंगभूमीचं पुढे काय होणार असे म्हटले जात असताना अशी एखादी गोष्ट घडणं ही मोठी गोष्ट आहे. प्राजक्त देशमुखसह या नाटकातील प्रत्येकाचं अभिनंदन. नाटकाची घौडदौड पुढे अशीच सुरू राहुदेत".
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचे नैपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केलं आहे. तर संगीत आनंद ओक यांनी केलं आहे. प्रफ्फुल्ल दिक्षीत यांने प्रकाशयोजना केली आहे. सध्या या नाटकाचे रंगभूमीवर जोरदार प्रयोग सुरू आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संंबंधित बातम्या