सलमानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे सोहेल खानची एक्स-वाईफ भीतीच्या छायेत, सीमाला सतावतेय 'ही' चिंता
Seema Sajdeh Worried For Kids : सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे सोहेल खानची एक्स-वाईफ सीमा सचदेह भीतीच्या वातावरणात आहे.
Seema Sajdeh Reaction on Salman Death Threat : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला वारंवार धमक्या येत आहे. सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना आधीही धमकी मिळाली आहे. सलमान खानचा मिळणाऱ्या धमक्यांचं सत्रही सुरुच आहे. असं असताना सलमान खानचा भाऊ सोहेल खानची एक्स-वाईफ सीमा सजदेह भीतीच्या छायेत आहेत.
सलमानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे सीमा सजदेह चिंतेत
अभिनेता सोहेल खानची एक्स-वाईफ सीमा सजदेह हिने सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सीमा सजदेहने यावर चिंता व्यक्त केली आहे. तिने म्हटलं की, तिला तिच्या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. बिश्नोई गँगची धमकी आणि बाबा सिद्दीकी यांची हत्या या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं जात आहे.
सोहेल खानची एक्स-वाईफ भीतीच्या छायेत
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. यामुळे त्याचे कुटुंबिय, मित्र आणि चाहतेही फार चिंतेत आहेत. सलमान खानच्या घरावर याआधी गोळीबार करण्यात आला होता. आरोपींनी सलमान खानला मारण्यासाठी 25 कोटींची सुपारीही घेतली होती. यामुळ सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिश्नोई गँगची धमकी आणि बाबा सिद्दीकी यांची हत्या या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षा बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.
सीमा सजदेहला सतावतेय 'ही' चिंता
सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सुपरस्टारचा धाकटा भाऊ सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह या धमक्यांमुळे खूपच घाबरली आहे. अलीकडेच सीमा सजदेहने एका मुलाखतीत सांगितलं की, "जेव्हा आम्ही आमच्या शोच्या पहिल्या सीझनचे शूटिंग सुरू केलं. त्यावेळी सोहेल आणि माझा घटस्फोट झालेला नव्हता. योहान आणि निर्वाण आमची दोन सुंदर मुले आहेत. त्यामुळेच मी सोहेल आणि खान कुटुंबाशी नेहमीच जोडलेली असेन. सोहेल आणि मी आमच्या आयुष्यात कितीही पुढे जात असलो तरीही". मुलांच्या सुरक्षेच्या कारणामुळे ती चिंतेत असल्याचं तिने यावेळी सांगितलं.
...जेव्हा सलमानला पहिल्यांदा धमकी मिळाली
सीमाने पुढे सांगितलं की, "खर सांगू तर, पहिल्यांदा जेव्हा सलमान भाईला धमकी आली, तेव्हा मी नक्कीच घाबरले होते. मला माझ्या मुलांच्या आणि संपूर्ण खान कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. कारण काहीही झालं तरी सर्व काही ठीक असावे आणि सर्वजण सुरक्षित असावेत, अशी इच्छा नेहमीच असते".
महत्त्वाच्या इतर बातम्या :