(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan OTT Release : सलमान खानचे (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची प्रतीक्षा करत असून आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता सिनेप्रेमी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला पसंती दर्शवतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
ईदच्या मुहूर्तावर 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भाईजानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केल्याने जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलीच कमाई करेल असा अंदाज होता. पण रिलीजच्या दोन दिवसांत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.
'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'वीरम' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमातील अॅक्शन ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातदेखील प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळत आहे.
'किसी का भाई किसी की जान' 'या' ओटीटीवर होणार रिलीज!
सिनेमागृहात धमाका केल्यानंतर 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ओटीटीवर या सिनेमाला सुगीचे दिवस येतील अशी शक्यता आहे. लवकरच हा सिनेमा झी 5 (Zee5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
'किसी का भाई किसी की जान'च्या कमाई बद्दल जाणून घ्या... (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection)
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटी, तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 25.75 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत या सिनेमाने 41.56 कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला हा सिनेमा आणखी चांगली कमाई करू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.
View this post on Instagram
संबंधित बातम्या