एक्स्प्लोर

Tiger 3 First Poster Out : टायगर जिंदा है...'टायगर 3'चं पहिलं पोस्टर आऊट! सलमान-कतरिनाच्या लूकने वेधलं लक्ष

Tiger 3 : 'टायगर 3' या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Salman Khan Katrina Kaif Tiger 3 First Poster Out : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) बहुचर्चित 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचं पहिलं पोस्टर आऊट झालं आहे. सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) नव्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सलमानने शेअर केलं 'टायगर 3'चं फर्स्ट लूक पोस्टर (Salman Khan Shared Tiger 3 First Look Poster)

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात सलमान खानने सोशल मीडियावर 'टायगर 3' सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. सलमानने लिहिलं आहे,"लवकरच येतोय... दिवाळी 2023 मध्ये 'टायगर 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार...तुमच्या जवळील सिनेमागृहात हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा नक्की पाहा". 

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'टायगर 3'च्या या पहिल्या पोस्टरमधील सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरमध्ये दोघांच्याही हातात बंदूक दिसत आहे. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है'नंतर 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

'एक था टायगर' हा सिनेमा 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. या सिनेमात सलमान खान टायगर नामक रॉ एजंटच्या भूमिकेत तर कतरिना आयएसआय एजंट जोयाच्या भूमिकेत होती. सलमान आणि कतरिनाची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली.  त्यानंतर ही जोडी 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' हा सिनेमा घेऊन आली. 'टायगर जिंदा है' या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. 

'टायगर 3' हा वाईआरएफ स्पाई यूनिवर्सचा पाचवा सिनेमा आहे. सहावर्षांनी सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. टायगर आणि जोयाच्या जोडीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता 'टायगर 3' हा सिनेमा 'टायगर जिंदा है' आणि 'एक था टायगर' या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIP

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Embed widget