एक्स्प्लोर

Salman Khan House Firing Case : मोठी बातमी : तुरुंगातील चादरीने आयुष्य संपवलं, सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपीचं टोकाचं पाऊल

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या एका आरोपींने तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Salman Khan House Firing Case : बॉलिवूड अभिनेता  सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले.  या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. 

सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी  पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन  या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापन याने आज तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, 

काही दिवसांपूर्वी झाली होती अटक 

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने  25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. सोनू हा शेती करतो, आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर, अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करतो, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आता अनुज थापनने आज तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे होते आदेश

सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या आरोपींनी बिहारमध्ये गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. या कटात अटक करण्यात आलेल्या चौघांशिवाय आणि अनमोल बिष्णोई वगळता आणखी काहीजण सहभागी असून मुंबई पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 

इतर संबंधित बातमी : 

मृत्युंजय सिंह हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा 18 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP News मध्ये डे. ब्युरो महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत. शिवाय एबीपी माझा या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीसाठीही ते सखोल वार्तांकन करतात. गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर सखोल रिपोर्टिंग करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षण विषयांतही विशेष रुची आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
Akanksha Chamola On Sunita Ahuja Viral Video: 'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
Rhiya Ahir BJP Leader Shehzad Poonawalla Row: व्हायरल गर्ल रिया अहिरनं 'अंकल' म्हटल्यानं भाजप नेता भडकला, म्हणाला, 'राहुल गांधींसारखाच तुझा...'
व्हायरल गर्ल रिया अहिरनं 'अंकल' म्हटल्यानं भाजप नेता भडकला, म्हणाला, 'राहुल गांधींसारखाच तुझा...'
Bipasha Basu Asked Help FDA Commissioner Tukaram Mundhe: बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; हादरवणारा व्हिडीओ काढून थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली...
बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; हादरवणारा व्हिडीओ काढून थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली...

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Share Market Crash : शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
Sangli Crime: जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
Rohit Gavit : मोठी बातमी, शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
Embed widget