"सलमान खाननं कोणत्याही प्राण्याची शिकार केलेली नाही..."; सलीम खान भावूक, दिलं स्पष्टीकरण
Salim Khan Exclusive Interview: सलमान खाननं कधीही प्राण्यांची शिकार केली नाही, सलमानला मिळणाऱ्या धमक्या केवळ खंडणीसाठी,आम्ही कुणाचीही माफी मागणार नाही, सलमान खान यांचे वडिल सलीम खान यांची भूमिका.
Salman Khan Father Salim Khan: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) काय सुरूये, असं सहजंच कुणी विचारलं तर, सर्वांच्या तोंडी दोन नावं येतील. सलमान खान (Salman Khan) आणि लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi). सध्या बॉलिवूडमध्ये या दोन नावांचाच सर्वाधिक उल्लेख होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्विकारल्याचं बोललं जात आहे. तेव्हापासून या प्रकरणात सलमान खान कनेक्शनही चव्हाट्यावर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीनं यापूर्वीही सलमान खानच्या घरावर हल्ला करून धमक्या दिल्या आहेत. या सगळ्या दरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सलीम खान यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या स्फोटक मुलाखतीतून अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. सलमानला मिळालेल्या धमकीची धग साहजिकच खान कुटुंबियांना बसतेय. या सगळ्यावर सलीम खान यांचं म्हणणं काय? सद्यस्थितीकडे ते कसं पाहतायत? अशा असंख्य प्रश्नांवर सलीम खान बेधडकपणे व्यक्त झाले आहेत. एबीपी न्यूजच्या पॉलिटिकल एडिटर मेघा प्रसाद यांनी सलीम खान यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत 'खतरे मे सलमान, एक्स्क्लुझिव्ह सलीम खान' घेतली असून त्यामध्ये सलीम खान यांनी थेट वक्तव्य करत, सलमान खान माफी मागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
सलमाननं कधीही प्राण्यांची शिकार केलेली नाही, सलमानला मिळणाऱ्या धमक्या केवळ खंडणीसाठी, आम्ही कुणाचीही माफी मागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी घेतली आहे.
सलमानला मिळणाऱ्या धमक्यांवर सलीम खान काय म्हणाले?
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्यांचं सत्र सुरू झाल्यापासूनच सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घरापासून अगदी शुटिंग स्पॉटपर्यंत सलमान अगदी पोलिसांच्या गराड्यात दिसून येतोय. दुसरीकडे सलमान खानला बिश्नोई टोळीकडून सातत्यानं धमक्या दिल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकरणादरम्यान, सलीम खान यांनी महत्त्वाचे खुलासे करत, स्पष्टीकरण दिलं आहे.
सलमाननं कोणत्याही प्राण्याला मारलेलं नाही : सलीम खान
सलीम खान म्हणाले की, "सलमाननं कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. सलमाननं कधी साधं झुरळ मारलेलं नाही. आमचा हिंसाचारावर विश्वास नाही." दरम्यान, एबीपी न्यूजसोबत संवाद साधताना, समीम खान यांनी लॉरेन्स बिश्नोईच्या वतीनं सलमान खानच्या माफीच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही किडेही मारत नाही : सलीम खान
सलीम खान म्हणाले की, "लोक आम्हाला सांगतात की, तुम्ही नेहमी खाली जमिनीकडे पाहत चालता. तुम्ही खूप सभ्य आहात. मी त्यांना सांगतो की, ही शालीनतेची बाब नाही, मला भिती वाटते की, माझ्या पायाखाली किडाही येऊन जखमी होईल. मी त्यांनाही वाचवत राहते. सलीम खान पुढे बोलताना म्हणाले की, लोक आम्हाला सांगतात की तुम्ही जमिनीकडे बघून चालता, तुम्ही खूप सभ्य माणूस आहात. मी त्यांना सांगतो की ही शालीनतेची बाब नाही, मला नेहमी भिती वाटते की, माझ्या पायाखाली एखादा किडा येऊन जखमी होईल. त्यामुळे मी त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न करतो.
सलमान लोकांना खूप मदत करतो : सलीम खान
सलीम खान म्हणाले की, बीइंग ह्युमननं किती लोकांना मदत केली आहे. कोविडनंतर नकार देण्यात आला, पण त्यापूर्वी रोज लांबच लांब रांगा लागायच्या. काहींना ऑपरेशन करायचं असायचं, काहींना इतर मदतीची गरज होती. रोज चारशेहून अधिक लोक मदतीच्या आशेनं यायचे.
नेमकं संपूर्ण प्रकरण काय?
काळविट प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोई यांनी सलमान खानकडे जोधपूरमधील बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याची मागणी केली होती. तसं न केल्यास सलमान खानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोई टोळीनं दिली होती.