(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan Dabangg tour In Kolkata: सलमानच्या दबंग टूरच्या तिकीटाची किंमत किती? कोणते सेलिब्रिटी होणार सहभागी? जाणून घ्या...
सलमान खानच्या (Salman Khan) दबंग टूर कॉन्सर्टचा तिकीट दर किती आहे? हा दबंग टूर कार्यक्रम कधी होणार आहे? याबबात जाणून घेऊयात...
Salman Khan Dabangg tour In Kolkata: हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. चित्रपटांसोबतच दबंग टूर रिलोडेड एंटरटेनमेंट कॉन्सर्टच्या माध्यमातून सलमान खान हा प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आता सलमानची दबंग टूर कोलकाता (Kolkata) येथे पोहोचली आहे. काही दिवसांमध्ये कोलकाता येथे दबंग टूर आयोजित केली जाणार आहे. सलमान खानच्या दबंग टूर कॉन्सर्टचा तिकीट दर किती आहे? हा दबंग टूर कार्यक्रम कधी होणार आहे? याबबात जाणून घेऊयात...
कोलकाता येथे होणार दबंग टूर कॉन्सर्ट
सलमानने (Salman Khan) दबंग कॉन्सर्टचे आयोजन परदेशात देखील केलं आहे. सलमान आता कोलकाता येथे दबंग टूरचे आयोजन करणार आहे. 13 मे 2023 रोजी कोलकाता येथील ईस्ट बंगाल क्लबमध्ये सलमानच्या दबंग टूर कॉन्सर्टचे आयोजन केले जाणार आहे. एका रिपोर्टनुसार, सलमान खानच्या दबंग टूरच्या तिकिटांची किंमत 699 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंत आहे. इतकेच नाही तर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 लाख ते 3 लाख रुपये मोजावे लागतील.
सलमान खानच्या दबंग टूर कॉन्सर्टमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. प्रभू देवा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, गायक गुरु रंधावा, आयुष शर्मा आणि मनीष पॉल यांसारखे सेलिब्रिटी कोलकातामध्ये सलमानसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, दबंग टूरच्या दरम्यान सलमान खान हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहे, असं म्हटलं जात आहे. शो संपल्यानंतर सलमान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे.
सलमानचे आगामी चित्रपट
सलमान खानचे 'किक 2', 'टायगर 3' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्य