सलमानला धमकी देत, 5 कोटी मागणाऱ्यानं आता मागितली माफी, चुकून मेसेज पाठवल्याचा निर्वाळा, पोलिसांकडून 'त्याचा' शोध सुरू
सलमानला धमकी देणाऱ्याने मागितली माफी, ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला चुकून धमकीचा मेसेज केल्याचा कबुली, पोलिसांकडून मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा झारखंडमध्ये शोध सुरु.
Salman Khan Threat Case: सध्या बॉलिवूड (Bollywood Actro) अभिनेता सलमान खान (Salman Khan) भलताच चर्चेत आहे. बॉलिवूडचा दबंग भाईजान पोलिसांच्या गराड्यात फिरत आहे. बाबा सिद्दिकींच्या (Baba Siddique) हत्येनंतर बिश्नोई गँग (Bishnoi Gang) आणि सलमान खान कनेक्शन चर्चेत आलं. तेव्हापासूनच सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता. तसेच, सलमान खानला खंडणीसाठी धमक्या देखील दिल्याचं समोर आलं होतं. पण, आता सलमानला धमकी देणाऱ्यानं माफी मागितली असून मी चुकून धमकी दिली, असं स्पष्टीकरण धमकी देणाऱ्यानं दिलं आहे.
सलमान खानला सातत्यानं धमक्या येत आहेत. अलिकडेच, वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर अभिनेत्याला धमकीचा मेसेज आला होता, ज्यामध्ये 5 कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली होती. आता त्या व्यक्तीनं आपली चूक मान्य केली असून चुकून मेसेज पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्या व्यक्तीनं स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचं सांगितलं होतं. मागितलेली रक्कम दिल्यास बिश्नोईसोबतचं वैर संपवू, असंही त्यानं सांगितलं होतं.
पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्स अॅपवर धमकी...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी मिळाली होती. पण, ही धमकी ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्स अॅप नंबरवर मॅसेज फॉरमॅटमध्ये मिळाली होती. अशातच सलमान खानला धमकी देणाऱ्यानं माफी मागितली होती. ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला चुकून धमकीचा मेसेज केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. पोलिसांकडून सध्या त्याच्या शोध सुरू असून आरोपी झारखंडचा असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
काही दिवसांपूर्वी पोलिसांना त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवरून एक मेसेज आला होता. ज्यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीनं माफी मागितली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं सलमान खानला धमकीचा मेसेज चुकून पाठवला असून त्याबद्दल त्याला खेद वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.सध्या पोलिसांना हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं झारखंडमधील लोकेशन सापडलं असून त्याच्या शोधात पोलिसांचं पथक तिथे पोहोचलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचा असल्याचं सांगितलं आणि दावा केला की, तो सलमान आणि लॉरेन्समध्ये समेट घडवून आणेल. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये अभिनेता सलमान खानकडून लॉरेन्स बिश्नोईशी असलेले दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं दावा केला होता की, तो सलमान आणि लॉरेन्स गँगमध्ये समेट घडवून आणेल, त्यासाठी त्यानं पैसे मागितले आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट होईल, असा इशारा दिला होता.
काही दिवसांपूर्वी आलेला धमकीचा मेसेज...
ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये मेसेजरनं दावा केला आहे की, "हे हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचं असेल, तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल. हा मेसेज मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या अनोळखी व्हॉट्सॲप नंबर युजरविरुद्धची तक्रार गांभीर्यानं घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
लॉरेन्स बिश्नोईला नोव्हेंबरमध्ये भेटणार सलमान खानची एक्स-ग्रलफ्रेंड, सोमी अली गँगस्टरला समजावणार