(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉरेन्स बिश्नोईला नोव्हेंबरमध्ये भेटणार सलमान खानची एक्स-ग्रलफ्रेंड, सोमी अली गँगस्टरला समजावणार
Somy Ali on Lawrence Bishnoi : सलमान खानची एक्स-ग्रलफ्रेंड सोमी अली हिने म्हटलं आहे की, ती लॉरेन्स बिश्नोईला भेटून त्याच्याशी बोलणार आहे.
Somy Ali Wants Meet Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बिश्नोई गँगची धमकी यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या दरम्यान, सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली चर्चेत आली आहे. सोमीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की, तिला लॉरेन्स बिश्नोईशी फोनवर बोलायचंय आणि बिश्नोई समाजाच्या मंदिरात पूजा करायचीय. आता पुन्हा एकदा सोमी अलीने लॉरेन्श बिश्नोईला भेटण्यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.
लॉरेन्स बिश्नोईला भेटणार सलमान खानची एक्स-ग्रलफ्रेंड
सोमी अलीने अलिकडेच एका मुलाखतीत म्हटलं आहे की, ती नोव्हेंबर महिन्यात लॉरेन्स बिश्नोईला भेटणार आहे. सोमीने म्हटलंय की, ती पुढच्या महिन्यात लॉरेन्स बिश्नोईला भेटून त्याच्यासोबत बसून त्याला समजावणार आहे की, हे त्याच्यामुळे झालेलं नाहीयामध्ये सलमान खानची काहीही चूक नाही, त्यामुळे तो माफी मागायचा संबंध येत नाही, असंही तिने म्हटलंय. सोमी अलीने आजतकशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
सोमी अली लॉरेन्स बिश्नोईला नोव्हेंबरमध्ये भेटणार
सोमी अलीने सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई संदर्भात दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, सलमान खानला याबाबत काहीही कल्पना नव्हती. बिश्नोई समाजात काळवीटाची पूजा केली जाते, हेही सलमानला माहित नव्हतं. त्याच्या याच्याशी काही संबंध नाही, त्यामुळे तो माफी मागण्याचं काहीही कारण नाही. तरीही त्याच्या वतीने मी माफी मागेन. दरम्यान, तिने यावेळी सांगितलं की, ती सलमानशी संपर्कात नाही. 2012 मध्ये त्यांनी एकमेकांशी संपर्क केला होता, त्यानंतर दोघांमध्ये काहीही बोलणं झालेलं नाही.
सलमान खानची एक्स-ग्रलफ्रेंड गँगस्टरला समजावणार
सोमी अली पुढे म्हणाली, "कुणाचीही हत्या व्हावी, असं मला वाटत नाही. यामध्ये माझा काहीही फयदा नाही, मला प्रसिद्धीही नकोय, पण कुणाचीही हत्या व्हायला नको. मी हिंसाचाराच्या विरोधात आहे". नोव्हेंबरमध्ये सोमी लॉरेन्स बिश्नोईला भेटणार आहे, असंही तिने यावेळी सांगितलं आहे.
लॉरेन्स भाई... मला तुमच्याशी बोलायचंय"
सोमी अलीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर लारेन्स बिश्नोईचा फोटो शेअर पोस्टमध्ये लिहिलं बोतं, "नमस्कार, लॉरेन्स भाई, तुम्ही तुरुंगातूनही झूम कॉल करता अशी माहिती मिळाली आहे, म्हणून मला तुमच्यासोबत झूम कॉलवर बोलून थोडी माहिती शेअर करायची आहे. कृपया मला सांगा हे कसं शक्य होईल? कृपया तुमचा मोबाईल नंबर द्या आणि हे तुमच्या फायद्याचंच असेल". या पोस्टमुळे सोमी खूप चर्चेत आली होती. तिच्यावर टीकाही झाली, त्यानंतर तिने इंस्टाग्रामवरुन पोस्ट हटवली.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :