Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे पाच चित्रपट काही ना काही कारणाने रिलीज होऊ शकलेले नाहीत.
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) काही दिवसांपासून व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' (Sikandar) या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. सलमान खानने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. पण त्याचे पाच चित्रपट मात्र अद्याप रिलीज झालेले नाहीत. कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न झाल्याने तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू झाल्याने सलमान खानचे चित्रपट (Salman Khan Movies) रिलीज झालेले नाहीत. सलमान खानने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सलमानकडे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक आपल्या चित्रपटांची ऑफर घेऊन येतात. सलमान खान इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानसोबत काम करण्याची सिने-निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्रींची इच्छा असते.
सलमान खानने 'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण या चित्रपटानंतर मात्र सलमानला खाली हात बसावं लागलं होतं. पहिल्या चित्रपटानंतर सलमान खानला अनेक चित्रपटांसाठी विचारणा झाली. पण या सगळ्यात त्याचे काही चित्रपट रिलीज होण्याआधीच बंद पडले. सलमान खानचे पाच चित्रपट कधीच सिनेमागृहात रिलीज झालेले नाहीत.
सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत
1. रण क्षेत्र : सलमान खान आणि भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाले. या चित्रपटासह दोघांनी आणखी एक चित्रपट साईन केला होता. रण क्षेत्र असं या चित्रपटाचं नाव होतं. पण या चित्रपटादरम्यान भाग्यश्रीने लग्न केलं आणि शूटिंग थांबलं. त्यानंतर हा चित्रपट बनलेला नाही. भाग्यश्रीने नकार दिल्यानंतर एकही अभिनेत्री हा चित्रपट करण्यास तयार नव्हती.
2. सैंया : सलमान खानने हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रीने माला सिन्हा यांची मुलगी प्रतिभा सिन्हासोबत एक चित्रपट साईन केला होता. 'सैंया' असं या चित्रपटाचं नाव होतं. प्रतिभा सिन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण प्रतिभाच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमुळे तिला हा चित्रपट करता आला नाही आणि शूटिंग थांबलं.
3. घेराव : सलमान खान 1991 मध्ये 'खामोशी' या चित्रपटात काम केल्यानंतर राजकुमार संतोषी यांच्या 'घेराव' या चित्रपटात काम करणार होता. चित्रपटाचा मुहूर्तही शूट झाला पण शूटिंग मात्र काही कारणाने झालं नाही.
4. आंख मिचौली : सलमान खान 'आंख मिचौली' या चित्रपटात काम करणार होता. या चित्रपटात सलमान दुहेरी भूमिकेत दिसणार होता. पण कथानकावर डाऊट आल्याने त्याने हा चित्रपट करण्याचं नाकारलं.
5. दस : मुकुल आनंद बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय दत्तसोबत 'दस' हा चित्रपट करणार होता. पण दिग्दर्शकाचा मृत्यू झाल्याने या चित्रपटाचं काम थांबलं. त्यानंतर कधीही हा चित्रपट होऊ शकला नाही.
संबंधित बातम्या