Bigg Boss OTT Season 3 : मराठीनंतर बिग बॉस ओटीटी सीजनमध्येही मोठा ट्विस्ट? होस्ट म्हणून अनिल कपूरचं नाव चर्चेत
Bigg Boss OTT Season 3 : बिग बॉस ओटीटी सीजन 3मध्येही एक सरप्राईज प्रेक्षकांना मिळणार आहे. दरम्यान या सीजनचा होस्ट कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Bigg Boss OTT Season 3 : नुकतच कलर्स मराठी वाहिनीकडून बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सीजनची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सीजनमध्ये प्रेक्षकांना एक गोड सरप्राईज देण्यात आलंय. या सिजनचं महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख होस्टिंग करणार आहे. त्यामुळे चाहत्यांनाही सुखद धक्का बसलाय. त्यातच आता हिंदी बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) तिसऱ्या सिजनबाबतही महत्त्वाची अपडेट समोर येतेय. या तिसऱ्या सीजनचं होस्टिंग सलमान खान करणार नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्याचप्रमाणे या सिजनच्या होस्टिंगसाठी अनिल कपूर यांचं देखील नाव चर्चेत असल्याचं म्हटलं जातंय.
गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस ओटीटी' सीझन 3 बाबत वेगवेगळे अपडेट्स समोर येत होते. कधी त्याच्या स्ट्रीमिंगच्या तारखेबद्दल चर्चा होत होती तर कधी काही कारणांमुळे हा सीझन येत नसल्याचे सांगितले जात होतं. अखेर जिओ सिनेमानाने चाहत्यांचा संभ्रम दूर केला आहे. कारण जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर बिग बॉस OTT 3 चा टीझर रिलीज करण्यात आलाय. ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की हा सीझन इतर सीझनपेक्षा खूपच वेगळा असणार आहे. यासोबतच शोच्या होस्टबाबत एक इशाराही देण्यात आला आहे.
अनिल कपूर करणार होस्ट?
या टीझरच्या शेवटी एका वाक्याने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कारण यात म्हटलं की, बिग बॉस ओटीटीचा वेगळा सीजन पाहून तुम्ही इतर सगळं विसरुन जाल, कारण हा सीजन एकदम झक्कास होणार आहे. सगळ्यांनाच माहित आहे की, झक्कास हा शब्द अनिल कपूरमुळे फेमस झाला आहे. त्यातच सलमान खान होस्ट करणार नसून यासाठी करण जोहर, अनिल कपूर आणि संजय दत्त यांची नावं चर्चेत होती. पण टीझरच्या शेवटी झक्कास हा शब्द वापरल्याने हा सीजनचं होस्टिंग अनिल कपूर करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
View this post on Instagram
'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'हे' सेलिब्रिटी दिसू शकतात... (Bigg Boss OTT 3 Contestants)
'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या दोन सीझनच्या यशानंतर निर्मात्यांनी तिसरा सीझनदेखील यशस्वी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनची दिव्या अग्रवाल विजेती झाली होती. तर दुसऱ्या पर्वाचा एल्विश यादव विजेता झाला होता. तर दुसरा रनरअप अभिषेक मल्हान होता. दिल्लीची वडा पाव गर्ल तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. वडा पाव गर्लसह अर्यांशी शर्मा, शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, रोहित खत्री, दलजीत कौर, अरहान बहल, शीझान खान, मॅक्सटर्न, ठगेश, श्रीराम चंद्रा आदि स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या विजेत्याला 'बिग बॉस'च्या टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची ऑफर देण्यात येते.