एक्स्प्लोर
अभिनेत्री रिंकू राजगुरुची छेडछाड, ठाण्याचा तरुण ताब्यात

पंढरपूर : 'सैराट' फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची छेडछाड केल्याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सोलापुरातील अकलूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ठाण्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे. अकलूजमध्ये छेडछाड झाल्यानंतर अकलूज पोलिसात कलम 354(ड ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ठाण्याचा आरोपी दत्तात्रेय गरत याला ताब्यात घेण्यात आलं आहे. माळशिरस येथील दिवाणी न्यायालयात आरोपीला उशिरा हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे. सैराट चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. रिंकू राजगुरु यंदा दहावीच्या परीक्षेला बसली आहे.
आणखी वाचा























