एक्स्प्लोर

फडणवीसांच्या आश्वासनांचा कंटाळा, मोदीजी तुम्हीच लक्ष घाला : सायरा बानो

भूमाफिया समीर मोटवानी यांच्यापासून दिलीप कुमार यांचा बंगला वाचवण्यासाठी सायरा बानो यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली आहे. नरेंद्र मोदीच आपली शेवटची आशा आहेत, असं म्हणत सायरा बानो यांनी मदतीची याचना केली आहे.

मुंबई : 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरो बानो यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचा कंटाळा आल्याची उद्विग्नता सायरो बानोंनी ट्वीटमधून व्यक्त केली. भूमाफिया समीर मोटवानी यांच्यापासून दिलीप कुमार यांचा बंगला वाचवण्यासाठी सायरा बानो यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली आहे. नरेंद्र मोदीच आपली शेवटची आशा आहेत, असं म्हणत सायरा बानो यांनी मदतीची याचना केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनांचा कंटाळा आल्याचंही सायरो बानोंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. काय आहे ट्वीट? 'सायरा बानो यांच्याकडून विनंती : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी तुमच्या भेटीची वेळ मिळण्याची वाट पाहत आहे.  'मी प्रयत्न करतोय' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनाचा आता कंटाळा आला आहे. दिलीप साहेबांचं एकमेव घर भूमाफिया समीर भोजवानीपासून वाचवण्यासाठी तुम्ही शेवटची आशा आहात. मी मदतीची भीक मागते.' असं ट्वीट सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर केले आहे. समीर भोजवानीविरोधात लढताना आपल्या भावाने मदत केली. मात्र त्याने दिलेल्या त्रासाचा ताण असह्य झाल्याने आपल्या भावाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला, असंही सायरा बानो यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. दोनच दिवसांपूर्वी समीर भोजवानीची तक्रार सायरा बानोंनी पंतप्रधानांकडे ट्विटरच्या माध्यमातून केली होती. 'भूमाफिया समीर भोजवानी तुरुंगातून सुटला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. भोजवानीकडून दिलीप कुमार यांना धमक्या दिल्या जात आहेत, पैसा आणि बळाचा वापर करुन घाबरवलं जात आहे' अशी तक्रार त्यांनी केली होती. काय आहे प्रकरण? मुंबईतील पाली हिल्स भागात दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या जागेवर समीर भोजवानीने दावा केला आहे. भोजवानीने धमकावून या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सायरा बानोंनी केला आहे. सायरा बानोंनी यापूर्वीही भोजवानीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिनयात समीर भोजवानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्याला अटकही झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget