Saif Ali Khan Attack : पोलिसांनी सैफच्या रक्ताचे नमुने घेतले, आरोपीच्या कपड्यावरील ब्लड सँपलची तपासणी होणार
Saif Ali Khan Knife Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

Saif Ali Khan Knife Attack Case : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी तपासासाठी सैफ अली खानचे रक्ताचे नमुने आणि कपडे गोळा केले आहेत. सैफ अली खानच्या राहत्या घरी घुसून एका चोरट्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला होता. हल्ल्यात सैफवर अनेक वार झाल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात होता. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या सैफला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
सैफ आणि आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने तपासणार
हल्ल्याच्या वेळी सैफ अली खानने घातलेले कपडे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय, घटनेच्या रात्री आरोपी शरीफुल इस्लामने घातलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले आहेत. त्याची चौकशी करण्यासाठी सैफ अली खानचे रक्ताचे नमुनेही गोळा करण्यात आले आहेत. एका तपास अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान आणि हल्लेखोराच्या रक्ताचे नमुने आणि कपडे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यावरून हल्लेखोराच्या कपड्यांवर असणारे रक्ताचे डाग सैफ अली खानच्या रक्ताचे आहेत की नाहीत, हे सिद्ध होईल.
आरोपीचे वकील काय म्हणाले?
सैफ अली खान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे वकील संदीप शेरखाने यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "आम्ही आमच्या क्लायंटचे सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो खाजगी लॅबला पाठवले आहेत आणि आम्ही दोन्ही जुळवत आहोत आणि त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहोत. आमचा क्लायंट त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारी व्यक्ती नाही. जेव्हा आम्हाला लॅब रिपोर्ट मिळेल, तेव्हा आम्ही तो कोर्टात सादर करू आणि पुढील युक्तिवाद करु".
पोलिसांनी सैफचा जबाब नोंदवला
मुंबई पोलिसांनी 24 जानेवारीला सैफ अली खानचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी मोहम्मद शहजाद आणि त्याच्या बांगलादेशी कुटुंबाने दावा केला आहे की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी आणि मोहम्मद शहजाद हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :























