एक्स्प्लोर

सैफ अली खान हल्ला प्रकरणावरुन 'विश्वसुंदरी'चा घुमजाव; ट्रोल झाल्यावर अभिनेत्री उर्वश रौतेला म्हणाली...

Saif Ali Khan Knife Attack : अभिनेता सैफ अली खानच्या राहत्या घरी घुसून एका चोराने त्याच्यावर चाकूहल्ला केला.

Urvashi Rautela on Saif Ali Khan Attack : विश्वसुंदरी उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणावर तिने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. उर्वशी रौतेलाला एका मुलाखतीत सैफच्या हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलं, त्यावेळी तिने सैफच्या तब्येतीबद्दल बोलण्याऐवजी तिच्या चित्रपटाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली. यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. 

सैफ अली खान हल्ला प्रकरणावरुन उर्वश रौतेला झाली ट्रोल

मुलाखतीतील सैफ अली खानच्या प्रश्नावर उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया समोर येताच नेटकऱ्यांनी तिला निशाण्यावर धरलं आहे. उर्वशी रौतेलाच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एएनआयने उर्वशीच्या नव्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर तिची मुलाखत घेतली. यामध्ये उर्वशी रौतेलाला सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल विचारलं असता, तिने त्याच्या प्रकृतीबद्दल काहीही म्हटलं नाही तर, तिच्या नवीन चित्रपटाबद्दल आणि इतर काही समस्यांबद्दल सांगितलं. यानंतर तिला ट्रोल केलं गेल्यानंतर आता तिने तिच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

"प्रत्येकजण वेगळीच कहाणी सांगत आहे"

उर्वशीने खुलासा करताना सांगितलं आहे की, सैफ अली खान हल्ल्याशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देताना तिला खूप काळजी घ्यायला हवी होती. अभिनेत्री उर्वशीने या घटनेबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, 'सैफसोबत पहाटे 4 वाजता ही दुर्घटना घडली आणि माझी मुलाखत सकाळी 8 वाजता होती. त्यामुळे, मला याबद्दल पूर्णपणे माहिती नव्हती. मला फक्त एवढंच आठवतं की, जेव्हा मी सकाळी उठले, तेव्हा कोणीतरी मला सांगितलं की, त्याला दुखापत झाली आहे. सैफ इतका गंभीर जखमी झाला आहे, हे मला माहित नव्हतं. माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत. आता तो बरा झाला आहे, पण मला अजूनही कळलेलं नाही की, नेमकं काय झालं होतं. कारण, प्रत्येकजण वेगळीच कहाणी सांगत आहे, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा किंवा काय प्रतिसाद द्यावा, हे मला कळत नाही, असं उर्वशीने म्हटलं आहे. तिने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

उर्वशी सैफबद्दल काय म्हणाली होती?

सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल विचारल्यावर उर्वशी मुलाखतीत म्हणाली होती की, "ही खूप दुःखद घटना आहे. आता, डाकू महाराजने बॉक्स ऑफिसवर 105 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि माझ्या आईने मला एक हिऱ्याचं रोलेक्स वॉच गिफ्ट केलं, तर माझ्या वडिलांनी मला एक हिऱ्याची अंगठी भेट दिली होती, पण मी या वस्तू सर्रासपणे घालू शकत नाही कारण, आमच्यावर कुणीही हल्ला करु शकतं, पण जे काही घडले ते खूप चुकीचं होतं. ' सैफच्या तब्येतीबद्दल बोलताना, उर्वशीने विषय बदलला आणि तिच्या नवीन चित्रपटाबद्दल आणि इतर विषयांबद्दल बोलली, ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

"तो मी नव्हेच", सैफवर हल्ला करणारा खरा आरोपी भलताच? CCTV मध्ये दिसणाऱ्याशी फेस रेकग्निशन करणार

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget