सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत मोठी अपडेट, वांद्रे स्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद; हल्लेखोर ‘या’ दिशेने पळाल्याचा संशय
Saif Ali Khan Attack Suspect : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी नालासोपारा-वसईच्या दिशेने पळाला असल्याचा संशय असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
Saif Ali Khan Knife Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी घुसून चोराने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. चोरीच्या प्रयत्नात सैफच्या घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, एकीकडे सैफच्या तब्येतीत सुधारणा होत असताना पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत मोठी अपडेट
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अजूनही फरार आहे. धारदार शस्त्राने हल्ला झाल्यामुळे सैफ अली खान जखमी झाला होता. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ही संधी साधत चोराने तिथून पळ काढला. यानंतर सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून क्राईम ब्रांच आणि पोलिसांची एकूण 20 पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आरोपी नालासोपारा-वसईच्या दिशेने पळाल्याचा संशय
पोलिसांकडून आरोपीला शोधण्यासाठी कसून तपास सुरु आहे. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत, पोलिस आरोपीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आता आरोपीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र सीसीटीव्हीत आरोपी ब्रिजहून उतरताना दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत आहे. हा आरोपी नालासोपारा-वसईच्या दिशेने पळाला असल्याचा संशय पोलिसांना आहे, त्या अनुशंगाने पोलिस तपास करत आहेत.
'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या चोराने मुलांच्या रुममध्ये जाऊन चोरीचा प्रयत्न केला. यावेळी मुलांची नॅनी तिथे पोहोचली आणि तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या आवाजामुळे सैफ अली खाने तिथे पोहोचला. सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरानेच सैफवर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोराने सैफवर सपासप वार केले. सैफच्या मानेवर आणि हातावर वार केले. इतकंच नाही, तर धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केला. यावेळी धारदार शस्त्राचा तुकडा त्याच्या पाठीत अडकला. हा नंतर शस्त्रक्रिया करुन सैफच्या शरीरातून बाहेर काढण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :