Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरण, आणखी एका संशयिताची ओळख पटली; याआधीही अशाप्रकारची चोरी करण्याचा प्रयत्न
Saif Ali Khan Stabbed : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चोराने हल्ला केल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Saif Ali Khan Knife Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळालं आहे. हल्लेखोर असण्याची शक्यता असलेल्या एका संशयिताची ओळख पटली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. पोलिस आणि क्राईम ब्रांच मिळून या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत. पोलिस आणि गुन्हे शाखेच्या एकूण 35 टीम यासाठी नेमण्यात आल्या आहेत.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी, आणखी एका संशयिताची ओळख पटली
पोलिसांना आता एका संशयित आरोपीची ओळख पटली असून पोलिस आता त्याच्या जुन्या गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी करून त्याला लवकरच अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा हा व्यक्ती पकडला जातो तेव्हा तो स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगतो, असं तपासात समोर आलं आहे. त्याचप्रमाणे, इतर भागातही त्याने गुन्हा केल्याचे समोर येत आहे.
याआधीही अशाप्रकारची चोरी करण्याचा आरोपीचा प्रयत्न
सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता पोलिसांच्या तपासाला यश आलं आहे. एका संशयित आरोपीची ओळख पटली आहे. या व्यक्तीने 11 डिसेंबर रोजी मुंबईच्या पूर्व उपनगरात अशीच चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. लोकांनी त्याला पकडले होत, पण तो मानसिक रुग्ण आहे, असे समजून नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन न करता सोडून दिलं.
सैफ अली खानची प्रकृती स्थिर
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चोराने हल्ला केल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चोराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळए सैफला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या निगराणी खाली आहे.