एक्स्प्लोर
Sacred Games Season 2 Trailer | 'बोले तो गेम ओव्हर', सेक्रेड गेम्सचा ट्रेलर प्रदर्शित
पहिला सीझन संपल्यानंतर पुढे काय होणार या प्रश्नाने सर्व प्रेक्षकांना व्याकुळ केले होतं. मात्र आता 15 ऑगस्टपासून या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

मुंबई : संपूर्ण भारताला वेड लावणाऱ्या नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पहिल्या सीझनमध्ये अनुत्तरित राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर दुसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहे. आज या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन 15 ऑगस्टपासून नेटफिल्क्सवर स्ट्रीम होईल. दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरची सुरुवात जुन्या गोष्टीच्या रिवाईंडने होते. यानंतर वेब सीरिजच्या नव्या व्यक्तिरेखा समोर येतात. 2 मिनिटं 10 सेकंदाच्या या ट्रेलमध्ये नवाजुद्दीन सिद्धीकी, पंकज त्रिपाठी, सैफ अली खान हे त्रिकुट जबरदस्त लूकमध्ये दिसतात. "कॅलेंडर निकालो भाईयों और बहनो, सेक्रेड गेम्स का रिलीज डेट आएला है", असं म्हणत नेटफ्लिक्स इंडियाने वेब सीरिजचा ट्रेलर आपल्या ट्विटर हॅण्डरवर शेअर केला आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं होतं. यंदा हा सीझन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी दिग्दर्शिक केला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर पुढे काय होणार या प्रश्नाने सर्व प्रेक्षकांना व्याकुळ केले होतं. मात्र आता 15 ऑगस्टपासून या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे. संबंधित बातम्या 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीजनमध्ये हे नवे चेहरे दिसणार 'सेक्रेड गेम्स'मधील बंटी मोठ्या पडद्यावर, 'या' चित्रपटात झळकणार
आणखी वाचा























