एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवर 'रुस्तम'कडून 'मोहंजोदारो'ला धोबीपछाड

मुंबई : बॉलिवूडचे दोन सुपरस्टार अक्षयकुमार आणि हृतिक रोशन यांची टक्कर बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी पाहायला मिळाली. तुल्यबळ अभिनेत्यांच्या दोन सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मात्र जमीन-आस्मानाचा फरक पाहायला मिळत आहे. रुस्तमने पहिल्या वीकेंडला 50.54 कोटी, तर मोहेंजोदारोने 31.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.   ‘रुस्तम’ सिनेमाने ओपनिंगच्या दिवशीच एकूण 14.11 कोटी रुपये कमवले. तर हृतिक रोशनच्या ‘मोहंजोदारो’ सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 8.87 कोटींची कमाई केली. प्रेक्षकांनी रुस्तमला पसंती दिल्यानंतर माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर आणखी प्रेक्षकवर्ग खेचून आणला, तर हृतिकच्या मोहंजोदारोला प्रेक्षकांनी नाखुशी दर्शवली. 15 ऑगस्ट हा एक्स्टेंडेड वीकेंड असल्यामुळे, त्यातच रुस्तम हा देशभक्तिपर चित्रपट असल्यामुळे रुस्तमच्या कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

पहिल्या वीकेंडची कमाई :

 रुस्तम ( कोटींमध्ये)

 मोहंजोदारो ( कोटींमध्ये)

शुक्रवार (12 ऑगस्ट) 14.11 8.87
शनिवार (13 ऑगस्ट) 16.43 9.93
रविवार (14 ऑगस्ट) 20 12.5
एकूण

50.54

31.3

  ‘रुस्तम’ सिनेमा देशभरात 2 हजार 300 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला असून, एअरलिफ्ट आणि हाऊसफुल 3 च्या तुलनेत हा आकडा कमी आहेत. मात्र, स्क्रीन्सच्या हिशोबाने पाहिल्यास ‘रुस्तम’ची पहिल्या दिवसाची कमाई अधिक आहे. कारण जास्त स्क्रीनवर रिलीज होऊनही एअरलिफ्ट सिनेमाने पहिल्या दिवसी केवळ 12.35 कोटी आणि हाऊसफुल 3 सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 15.02 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.   आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहंजोदारो’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 8 कोटी 87 लाखांची कमाई केली. या सिनेमातून पूजा हेगडेने पदार्पण केलं असून, हृतिक रोशनसारखा लोकप्रियतेचं मोठं वलय असलेला अभिनेताही यात आहे. मात्र, तरीही सिनेमाने पहिल्याच दिवशी म्हणावी तशी कमाई केल्याचं दिसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Shruti Hasan on periods: 'मला असं वाटतं पुरुषांनाही मासिक पाळी...'; श्रुती हासन नेमकं काय म्हणाली? ‘मी हजार वेळा प्रार्थना केली की...
'मला असं वाटतं पुरुषांनाही मासिक पाळी...'; श्रुती हासन नेमकं काय म्हणाली? ‘मी हजार वेळा प्रार्थना केली की...
Oscar Gondhal: महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करवारीवर; OTTवर रिलीज होणार? हा सिनेमा कुठे पाहता येणार?
महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करवारीवर; OTTवर रिलीज होणार? हा सिनेमा कुठे पाहता येणार?
Mallika Sherawat on Tukaram Mundhe: 'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
Actress Car Attack: बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?
बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
Embed widget