एक्स्प्लोर

आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली

याप्रकरणी, मुदतवाढ मागणारा आयुक्तांचा अर्ज कोर्टाने फेटाळला असून मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. बोरिवलीतील BEST बस डेपोसाठी आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यास विलंब केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या वेतनाला स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. या कारवाईनंतर आज या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात (SC) माफी मागण्यात आली आहे. 

बोरिवलीतील BEST बस डेपोसाठी (BEST Depot ) राखीव जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करत मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. न्यायालयाच्या दोन आदेशांचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने आयुक्तांवर ताशेरे ओढले. याप्रकरणी, मुदतवाढ मागणारा आयुक्तांचा अर्ज कोर्टाने फेटाळला असून मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

दरम्यान, अवमान प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत आयुक्त आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. मराठी कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी वेळ लागल्याचा पालिकेचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आता BEST बस डेपो अतिक्रमण प्रकरणी आयुक्त अश्विनी भिडे यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिला असून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानंतर, महापालिकेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यात आली. 

उद्यापर्यंत न्यायालयात अनुपालन प्रतिज्ञापत्र

महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाला माहिती दिली की, न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. तसेच, यापूर्वी प्रशासनाची बाजू मांडताना केलेल्या समर्थनाबद्दल वकिलांनी न्यायालयाची वैयक्तिक माफी मागितली. प्रशासनाला आपली चूक लक्षात आली असून, उद्यापर्यंत न्यायालयात अनुपालन प्रतिज्ञापत्र (Compliance Affidavit) दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही महापालिकेच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

Borivali News : बोरिवली BEST बस डेपोचा वाद नेमका काय?

बोरिवलीमधील BEST बस डेपोच्या जागेवरून मुंबई महानगरपालिका (BMC) आणि एका खासगी विकासकादरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर वाद सुरू आहे.

Borivali BEST Depot News :नेमकं प्रकरण काय आहे?

बोरिवलीमध्ये सार्वजनिक BEST बस डेपो उभारण्यासाठी एक भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, या जागेचा ताबा आणि वापर यावरून मुंबई महानगरपालिका आणि खासगी विकासक यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू झाली.

ऑगस्ट 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले. संबंधित खासगी विकासकाने या भूखंडाचा रिकामा आणि शांततापूर्ण ताबा मुंबई महानगरपालिकेला द्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या जागेवरील प्रशासकीय इमारतीचाही ताबा BMC कडे देण्याचे निर्देश देण्यात आले.

हेही वाचा

BEST बस डेपो अतिक्रमणप्रकरणी आयुक्त अश्विनी भिडे यांना सुप्रीम कोर्टाचा दणका; पगार रोखण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
Mumbai Crime News: छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ED ची कारवाई; मुंबईच्या डोंगरीतील लांबत इमारतसह एकूण चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ED ची कारवाई; मुंबईच्या डोंगरीतील लांबत इमारतसह एकूण चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
Embed widget