एक्स्प्लोर

Adinath Kothare Ramayana Movie: 'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा

Adinath Kothare Ramayana Movie: आदिनाथ कोठारे 'रामायण' सिनेमाबाबत म्हणाला की, "रामायण'मधील माझा अनुभव शब्दांत सांगणं कठीण आहे. तो अनुभव प्रत्यक्ष घेतलाच पाहिजे. चित्रपटाचं भव्य स्वरूप आणि त्याचं महत्त्व मला पहिल्याच दिवशी जाणवलं..."

Adinath Kothare Ramayana Movie: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांची मुख्य भूमिका असलेला 'रामायण' (Ramayana Movie) हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. या भव्य सिनेमात आदिनाथ कोठारे यानं प्रभू श्रीरामांचे धाकटे बंधू 'भरत' यांची भूमिका साकारली आहे. शुटिंगचा अनुभव आणि सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना आदिनाथ कोठारे यानं सांगितलं की, तिथे एखाद्या मंदिरात असल्यासारखं वाटत होतं. त्यानं दिग्दर्शक नितेश तिवारी यांचं कौतुक केलं आणि सांगितलं की, त्यांनी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडेही बारकाईनं लक्ष दिलंय. तसेच, सेटवरील वातावरण अत्यंत शिस्तबद्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

आदिनाथ कोठारे 'रामायण' सिनेमाबाबत काय म्हणाला? (Adinath Kothare On Ramayana Movie Casting)

'बॉलिवूड लाईफ'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आदिनाथ कोठारेनं 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचे काही अनुभव शेअर केलेत. तसेच, आदिनाथनं 'रामायण' सिनेमासाठी निवड कशी झाली? याचाही किस्सा सांगितला. 

आदिनाथ कोठारे 'रामायण' सिनेमाबाबत म्हणाला की, "रामायण'मधील माझा अनुभव शब्दांत सांगणं कठीण आहे. तो अनुभव प्रत्यक्ष घेतलाच पाहिजे. चित्रपटाचं भव्य स्वरूप आणि त्याचं महत्त्व मला पहिल्याच दिवशी जाणवलं..."

'रामायण' सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा सांगताना आदिनाथ कोठारे म्हणाला की, "आम्ही अयोध्येतील एका प्रसंगाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी रणबीर कपूर, रवी दुबे, साई पल्लवी, अरुण गोविल यांच्यासह इतर सगळे कलाकार उपस्थित होते. त्या सेटवर उभं राहून पहिला सीन साकारताना आम्ही अभिनयावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र, तिथून बाहेर पडून घरी गेल्यानंतर आपण नेमकं काय केलं? याची जाणीव झाली. मला आठवतंय, मी आई-वडिलांना सांगितलं होतं की, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. देशातील काही सर्वोत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, ही खूप आनंदाची गोष्ट होती..."

आदिनाथ कोठारे पुढे बोलताना म्हणाला की, "पहिल्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो. सुरुवातीच्या काही दिवसांत कलाकार म्हणून आपण त्या व्यक्तिरेखेला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सेटवर स्वतःला कसं वावरायचं, इतर कलाकारांबरोबरच नातं कसं असेल, याचा अंदाज घेत असतो. सेटवर सहज वावरता यावं यासाठी प्रयत्न करत असतो. एकदा आम्ही एका सीनसाठी उभे होतो. त्यावेळी मी, श्रीराम, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे सगळे जण तिथे होतो. आम्हाला एका गोष्टीकडे पाहून त्यावर रिअॅक्शन द्यायची होती. आम्ही त्या सीनचा सराव केला होता. त्यावेळी माझ्या मनात काहीतरी वेगळं करण्याचा विचार आला होता; पण मी घाबरलो होतो. त्यामुळे नितेश सरांनी सांगितल्याप्रमाणेच करत होतो. शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी जे करण्याचा विचार करत होतो, तेच करण्याचा सल्ला दिला. मी तसं केलं आणि शॉट संपल्यानंतर नितेश सरांनी मोठ्याने माझं कौतुक केलं. त्या क्षणामुळे माझा संकोच दूर झाला आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग झालो..."

सेटवर पाऊल ठेवणं म्हणजे, मंदिरात प्रवेश करण्यासारखं... : आदिनाथ कोठारे 

आदिनाथ कोठारे म्हणाला की, त्यानं आपल्या पालकांना सांगितलं होतं की, हा एक अत्यंत भव्य प्रकल्प आहे. देशातील सर्वोत्तम प्रतिभावान व्यक्तींचा समावेश असलेल्या टीमचा भाग असणं, ही एक अद्भूत भावना होती. त्यानं सेटवरील वातावरणाचं वर्णन करताना सांगितलं की, तिथे एक प्रकारचं पावित्र्य आणि जबाबदारीची जाणीव होती. त्यानं असंही सांगितलं की, एका दृश्याच्या वेळी जेव्हा तो खूप अस्वस्थ होता, तेव्हा रणबीर कपूरनं त्याचं धैर्य वाढवलं. आदिनाथ म्हणाला, "रामायण'च्या सेटवर अत्यंत शिस्त होती; तिथे मोबाईल फोन नेण्यास मनाई होती. ही शिस्त एका पवित्र ऊर्जेचा भाग होती, ज्यानं सर्वांना एकत्र बांधून ठेवलं होतं. 'रामायण'च्या सेटवर पाऊल ठेवणं म्हणजे, एखाद्या मंदिरात प्रवेश करण्यासारखंच होतं..."

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Scolds Kranti Redkar: 'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
Madhuri Dixit Attended Manish Malhotra Diwali Party 2026: माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
Ibrahim Khan On Kareena Kapoor Koffee With Karan 9: 'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
Aamir Khan Gauri Spratt Home: आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget