एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात

Ravindra Dhangekar on Gokul Election : गोकुळच्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाची एन्ट्री झाली असून, पुण्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करत एक मोठा दावा केला आहे.

पुणे: गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली की गोकुळची निवडणूक. कोल्हापूर जिल्ह्यातील साडे 5 लाख शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण अद्यापही तापलेलं आहे. महायुतीला 12 तर सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे 13 जागा निवडून आल्या, तरीही अद्याप अध्यक्ष निवडीचा मुद्दा तापलेला आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकारकडून गोकुळवर शासन नियुक्त 4 सदस्यांची वर्णी लागली आहे. त्यानंतर आता महायुतीचं पॅनेल गोकुळमध्ये सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे या गदारोळात आता शिवसेना शिंदे गटाची एन्ट्री झाली असून, पुण्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करत एक मोठा दावा केला आहे.(Ravindra Dhangekar)

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयाच्या एका जुन्या निर्णयाचा संदर्भ देत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये असताना अशाच प्रकारच्या स्वीकृत सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने, "अशा प्रकारच्या स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देता येणार नाही," असे स्पष्ट आदेश दिले थे. धंगेकर यांनी या ऐतिहासिक न्यायालयाच्या निकालाची प्रत देखील सोशल मिडीया एक्सवरती शेअर करत आपलं मत परखडपणे मांडलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्रात पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी सहकारी संस्थांना स्वातंत्र्य देऊन मोठी ताकद दिली, म्हणूनच देशात सर्वात समृद्ध सहकार चळवळ आपल्या राज्यात उभी राहिली आणि शेतकऱ्यांचा आधार बनली. एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या कार्यकाळात सर्वसामान्यांचे हित जपून या संस्थांच्या पाठीमागे नेहमीच खंबीर नेतृत्व दिले. पण आज 'गोकुळ' दूध संघाच्या स्वायत्ततेवर घाला घातला जात आहे. सहकाराला चालना देण्यासाठी सरकारने या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, राजकीय हस्तक्षेप टाळावा आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालकांना त्यांचा कारभार करू द्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे(Ravindra Dhangekar)

Ravindra Dhangekar on Gokul Election : पोस्टमध्ये रविंद्र धंगेकरांनी नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्रात पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी सहकारी संस्थांना स्वातंत्र्य देऊन मोठी ताकद दिली, म्हणूनच देशात सर्वात समृद्ध सहकार चळवळ आपल्या राज्यात उभी राहिली आणि शेतकऱ्यांचा आधार बनली. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीही आपल्या कार्यकाळात सर्वसामान्यांचे हित जपून या संस्थांच्या पाठीमागे नेहमीच खंबीर नेतृत्व दिले.पण आज 'गोकुळ' दूध संघाच्या स्वायत्ततेवर घाला घातला जात आहे. 5,400 दूध संस्था आणि साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या लोकशाही कौलाचा आदर राखला गेलाच पाहिजे. केवळ संघ ताब्यात ठेवण्याच्या धावपळीतून किंवा राजकीय कुरघोडीतून शासन नियुक्त संचालकांचा हस्तक्षेप झाल्यास या नावारूपाला आलेल्या संस्था मोडकळीस येतील.

यापूर्वी 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेत स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकाला 'सभागृह नेता' (Leader of the House) करण्याच्या बेकायदेशीर निर्णयाविरोधात मी स्वतः माननीय उच्च न्यायालयात (Writ Petition No. 2155/2021) कायदेशीर लढाई लढलो होतो. त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवत आदेश दिला होता की, लोकशाही मार्गाने थेट जनतेतून निवडून न आलेल्या स्वीकृत/नामनिर्देशित सदस्याला अशा महत्त्वाच्या पदांवर बसण्याचा किंवा लोकशाही अधिकारांवर गदा आणण्याचा अधिकार नाही! जो न्याय महापालिकांना लागू होतो, तोच सहकार क्षेत्रालाही लागू आहे. थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आणणे हा लोकशाहीचा पराभव आहे. सरकारला आमची नम्र पण आक्रमक विनंती आहे, सहकाराला चालना देण्यासाठी सरकारने या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, राजकीय हस्तक्षेप टाळावा आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालकांना त्यांचा कारभार करू द्यावा!

Gokul President Election 2026: मतदानाचा अधिकार दिल्यास गोकुळच्या अध्यक्ष निवडीचे चित्र बदलू शकतं

महायुती सरकारकडून गोकुळ दूध संघावर 4 शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या (Gokul President Election 2026) निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet) मंजूरी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या 4 स्वीकृत सदस्यांना सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारही देण्यात आला आहे. सध्या गोकुळमध्ये सतेज (बंटी) पाटील (Satej Patil) यांच्या गटाचे बहुमत आहे. परंतु सरकारने बाहेरून हे 4 सदस्य नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्यास गोकुळच्या अध्यक्ष निवडीचे चित्र बदलू शकतं. त्यामुळे या निर्णयाला महाविकास आघाडी विशेषतः सतेज पाटील यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. ही लोकशाहीची गळचेपी असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली होती.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : 'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
B. R. Gavai On Gokul President 2026: गोकुळवर 5 शासननियुक्त संचालक नेमण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय; पण माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या एका विधानाने सरकारची अडचण?
गोकुळवर 5 शासननियुक्त संचालक नेमण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय; पण माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या एका विधानाने सरकारची अडचण?
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
Embed widget