Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
आधी वैष्णवी, मग तृष्णा, त्यानंतर सोनाली आणि आता पायल... हुंड्यासाठी छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळणाऱ्या विवाहितांची यादी वाढतच चाललीय... लग्नात ५० तोळे सोनं आणि २५ लाख रूपये दिले, थाटामाटात लग्न लावताना ८० लाखांचा खर्च केला... तरी देखील सासरच्या मंडळींची हाव संपली नाही असा आरोप पायलच्या माहेरच्यांनी केलाय... अखेर पायलनं गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं...यामुळे पुन्हा प्रश्न उपस्थित झाला की हुंड्यापोटी आणि किती वैष्णवी किंवा पायलचा बळी जाणार..? पायल झांबरेच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा एक भयाण वास्तव अधोरेखित केलंय.. त्यावरचाच आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा हा स्पेशल रिपोर्ट
पायल झांबरे प्रकरण
भावाला शेवटचा मेसेज अन् फोन बंद,
लेकीसाठी कुटुंब रात्रभर तळमळत राहिलं,
सासरच्यांकडून 10 तास लपवाछपवी
पायलच्या मृत्यूआधी काय घडलं ?
पुण्यातील मुकुंदनगर परिसरात ३४ वर्षीय विवाहित तरुणी पायल झांबरे हिच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. दिवाळी सणाला घरून १० तोळे सोनं घेऊन यावं, यासाठी तिचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याच छळाला कंटाळून तिने आपल्या सासरच्या कुटुंबाच्या जुन्या फ्लॅटमध्ये गळफास लावून जीवन संपवलं आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री तिने आपल्या भावाला टेक्स्ट मेसेज केला होता. यानंतर तिचा फोन बंद झाल्याची माहिती आता समोर आली. घटनेच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? याचा सविस्तर घटनाक्रम भाऊ ऋषीकेश पवार याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितला आहे. प्रकरणी पोलिसांनी पायलचा पती अक्षय अरविंद झांबरे याच्यासह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ३० मार्च २०२३ रोजी पायलला मुलगी झाली. मुलगी झाल्यावर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात जाऊन वाद घातला आणि "आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली, आम्ही ही मुलगी सांभाळणार नाही," असं म्हणून ते तिथून निघून गेले. त्यानंतरही वारंवार तिला मुलगी झाल्यामुळे घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करणे आणि शारीरिक-मानसिक त्रास देणं सुरूच ठेवलं होते. टोकाचं पाऊल उचलण्याआधी शेवटचा मेसेज भावाला घटनेच्या दिवशी १ नोव्हेंबर २०२६ ला पायल माहेरहून सासरी परतली होती. रात्री ९:१८ मिनिटांनी तिने फिर्यादी भाऊ ऋषीकेशला मोबाईलवरून एक टेक्स्ट मेसेज पाठवला, ज्यामध्ये तिने "माझी सासू जबाबदार आहे" असं लिहिलं होतं. भावाने ताबडतोब तिच्या फोनवर संपर्क साधला असता तिने फोन उचलला नाही. जेव्हा तिच्या पतीला फोन केला, तेव्हा त्याने उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली आणि घरच्या भांडणात पडू नका, असे सांगून फोन कट केला.
All Shows
































