एक्स्प्लोर

Earthquake Ss Rajamouli : अन् जमीन हादरू लागली; भूकंपातून राजामौली बचावले, मुलाने सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

Director S S Rajamouli : चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय हे भूकंपात बचावले आहेत. कार्तिकेय यानेच हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला.

S. S. Rajamouli  :  चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय हे भूकंपात बचावले आहेत. गुरुवारी, 21 मार्च रोजी आलेल्या जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा  भूकंप 5.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय याने सांगितले की,  भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आरआरआर चित्रपटाची सगळी टीम 28 व्या मजल्यावर होती. 

एसएस कार्तिकेय याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनुभव सांगताना म्हटले की, जपानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला.  त्यावेळी आम्ही 28 व्या मजल्यावर होतो, जमीन हादरू लागली. हा भूकंपाचा धक्का आहे हे जाणवण्यासाठी काही वेळ जावा लागला. त्यावेळी मी भितीने ओरडणार होतो. आमच्या आजूबाजूला जपानी नागरीक होते. त्यांना याचा काहीच फरक पडला नाही. 

जपानमध्ये जाणवले भूकंपाचे 21 धक्के

जपानच्या हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, जपानच्या पूर्व भागातील इबाराकीमध्ये 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. नव्या वर्षात एक जानेवारी रोजी जपानमध्ये 21 धक्के जाणवले. यामध्ये एका भूकंपाची तीव्रता 7.6  रिश्टर स्केल इतकी होती. 

आरआरआरच्या स्क्रिनिंगसाठी राजामौली जपानमध्ये

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

एसएस राजामौली हे चित्रपटाच्या टीमसह गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत. चित्रपटाची टीम आणि कुटुंबासह आरआरआरच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी राजामौली जपानमध्ये आहेत. राजामौली यांचा हा चित्रपट जपानमध्ये गेल्या 513 दिवसांपासून झळकत आहे. जपानमध्ये या चित्रपटाची क्रेझ दिसून आली. स्क्रिनिंग दरम्यान एका चाहत्याने राजामौली यांना शुभेच्छा म्हणून एक हजार ओरिगामी क्रेन भेट दिल्या होत्या.

राजामौलींनी एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यात 'बाहुबली' (Baahubali) ते 'आरआरआर' (RRR) या सिनेमांचा समावेश आहे. एस. एस. राजामौलींनी ज्यु. एनटीआर (Jr. NTR) मुख्य भुमिकेत असलेल्या 'स्टुडंट नं. 1' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून 2001 मध्ये दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले. भारतात हा सिनेमा चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. 

 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget