एक्स्प्लोर
ऋषी कपूर-जुही चावला जोडी 20 वर्षांनंतर पुन्हा एकत्र
हिंदी सिनेसृष्टीत ऋषी कपूर आणि जुही चावला या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री जुही चावला ही प्रसिद्ध जोडी तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सोशल मीडियावरुन यासंदर्भात घोषणा करण्यात आली. 1996 साली प्रदर्शित झालेल्या 'दरार' सिनेमात ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी दिसली होती.
अभिनेत्री जुही चावला हिने सोमवारी ट्विटरवर सिनेमाच्या स्टारकास्टसोबतचा फोटो ट्वीट करत, सिनेमासंदर्भातील माहिती दिली. दिल्लीत शूटिंगला सुरुवात होणार असल्याचेही जुहीने ट्वीटमधून सांगितले.
हिंदी सिनेसृष्टीत ऋषी कपूर आणि जुही चावला या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. 1992 साली 'बोल राधा बोल', 1994 साली 'इना मीना डीका', 'साजन का घर' अशा सिनेमांमध्ये ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी एकत्र दिसली होती.
या सिनेमाच्या निर्मात्यांच्या माहितीप्रमाणे, सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नसून, सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स इन इंडिया आणि मॅकगुफिन पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सिनेमाचं कथानक काय असेल, हे अद्याप कळू शकलेलं नाही, तरी दिल्ली शहराची या सिनेमाच्या कथानकाला पार्श्वभूमी असेल. हितेश भाटिया सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून, सुप्रतिक सेन यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.Waiting to join the unit , shoot in delhi , and scrabble championships with Chintuji ..!!!😈..😄..🤩🤩🤩🤩 @chintskap @HoneyTrehan @vivekkrishnani #AbhishekChaubey #HiteshBhatia pic.twitter.com/YCGz03Pc80
— Juhi Chawla (@iam_juhi) September 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement