एक्स्प्लोर
रिंकूच्या आई-बाबांची मराठी सिनेमात एन्ट्री
'सैराट'मध्ये रिंकूच्या आई बाबांची भूमिका साकारणारे भक्ती चव्हाण आणि सुरेश विश्वकर्मा हेदेखील या सिनेमात काम करणार आहेत.
मुंबई : 'सैराट'ची आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं. आता रिंकूचे रिअल आणि रील आई-बाबा एकाच मराठी सिनेमात झळकणार आहेत.
आगामी 'एक मराठा, लाख मराठा' या सिनेमातून रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटातील 'हे प्रभो शिवाजी...जय भवानी जय शिवाजी' या गाण्यात ते दोघे दिसतील. तर 'सैराट'मध्ये रिंकूच्या आई बाबांची भूमिका साकारणारे भक्ती चव्हाण आणि सुरेश विश्वकर्मा हेदेखील या सिनेमात काम करणार आहेत.
'एक मराठा लाख मराठा' हा सिनेमा म्हणजे शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणाची ही कथा आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी तो स्वतः एकटा संघर्ष करतो. त्याच्या संघर्षाचं रुपांतर मोठ्या मोर्चा मध्ये कसं होतं ते त्यालाही कळत नाही. आता त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य असतं ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणं. यात तो यशस्वी होतो का? हे सिनेमात पाहायला मिळेल
नुकतंच छत्रपती उदयराजे भोसले यांच्या हस्ते या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. गणेश शिंदे या तरुणाने 'एक मराठी लाख मराठा' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर साई सिने फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिनेमाला संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांचे संगीत लाभले आहे. येत्या 24 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम,मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे,नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची,उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण,राधिका पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement