Richa Chadha Ali Fazal Wedding : रिचाच्या हातावर रंगली अलीच्या नावाची मेहंदी; व्हिडीओ व्हायरल
Richa Chadha Ali Fazal : रिचा चड्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Richa Chadha Ali Fazal Marriage Pics : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नासोहळ्याला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर रिचा आणि अलीचे प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत.
रिचा चड्ढाने सोशल मीडियावर अलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोतील आऊटफिटवरुन हे फोटो रिचा आणि अलीच्या संगीतसोहळ्यातील असल्याचा अंदाज येत आहे. याआधी रिचाने मेहंदी सोहळ्याची झलकदेखील चाहत्यांसोबत शेअर केली होती. रिचाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या हातावर भरगच्च मेहंदी काढण्यात आली आहे. मेहंदीची डिझाईन फ्लॉन्ट करताना रिचा दिसून येत आहे.
View this post on Instagram
रिचाने शेअर केलेला मेहंदीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मेहंदीमध्ये खास मांजरीचा चेहरादेखील बनवण्यात आला आहे. रिचाकडे जुगनी आणि कमली अशा दोन मांजरी आहेत. दोन्ही मांजरींवर तिचं प्रचंड प्रेम आहे. त्यामुळेच तिने हातावर काढण्यात आलेल्या मेहंदीमध्ये मांजरीचा चेहरादेखील काढला आहे. तसेच मेहंदीमध्ये अली आणि रिचाच्या नावाचं पहिलं अक्षरदेखील काढण्यात आलं आहे.
रिचा-अली लवकरच अडकणार लग्नबंधनात!
रिचा आणि अलीचा लग्नसोहळा दिल्लीत पार पडत असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रिचा आणि अली येत्या चार ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा आणि अलीच्या लग्नातील सर्व कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासाडी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या