Richa Chadha Ali Fazal Wedding : आता आग लागणार.. रिचा आणि अलीच्या लग्नाची पत्रिका चक्क काडेपेटीवर; वेडिंग कार्ड व्हायरल
Richa Chadha Ali Fazal Wedding : रिचा चढ्ढा आणि अली फजलची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Richa Chadha Ali Fazal Wedding Card : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांची लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नाची थीम रेट्रो असेल याचा लग्नपत्रिकेवरुन अंदाज येतो आहे. लग्नपत्रिकेची डिझाईन माचिसच्या डबीसारखी आहे. पॉप आर्ट पद्धतीनं तयार केलेलं दोघांचं चित्र माचिसच्या डबीवर आहे. माचिसच्या डबीचा लुक पूर्णपणे नव्वदच्या दशकातला आहे.
रिचा चड्ढा आणि अली फजल या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिचा-अलीच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिचा आणि अलीचा संगीत आणि मेहेंदीचा कार्यक्रमदेखील खास असणार आहे. रिचा चड्ढा आणि अली फजल मागील वर्षात लग्नबंधनात अडकणार होते. पण कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांची लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
View this post on Instagram
रिचा चड्ढा सध्या तिच्या आगामी 'हीरामंडी' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय लीला भंसाळी सांभाळत आहेत. तर दुसरीकडे अली फजल 'मिर्जापूर 3'चे शूटिंग पूर्ण करत आहे. रिचा आणि अली लवकरच 'फुकरे 3' मध्ये दिसणार आहेत.
संबंधित बातम्या