रियानं मौन सोडलं! सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच दिली मुलाखत; आरोपांचं खंडन केले नवे खुलासे
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी वारंवार होणाऱ्या आरोपांवर अखेर रियाने आपलं मौन सोडलं आहे. रियाने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात येणाऱ्या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच तिने अनेक नव्या गोष्टींचे खुलासेही केले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणी दररोज नवनवे खुलासे केले जात आहेत. या प्रकणात अनेक लोकांवर संशयाची सुई रोखली जात आहे. अशातच या प्रकरणाला आता एक आणखी नवं वळणं मिळालं आहे. आता या प्रकरणातील ड्रग अँगलही समोर आला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुख्य दोषी मानलं जात आहे. अभिनेत्याचे वडील के. के. सिंह यांनी रियावर आरोप लावलाय की, ' रियाने सुशांतचे पैसे फक्त स्वतःसाठीच खर्च केलेले नाहीत. तर तिने आपल्या कुटुंबियांनाही खर्चासाठी सुशांतचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. तसेच रियानेचे माझ्या मुलाचा खून केलाय, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.
वारंवार होणाऱ्या आरोपांवर अखेर रियाने आपलं मौन सोडलं आहे. रियाने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात येणाऱ्या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच तिने अनेक नव्या गोष्टींचे खुलासेही केले आहेत.
रियावर मुलाखतीत बोलताना सांगितले की, 'मी पॅरिसला एका कंपनीच्या शुटिंगसाठी गेले होते. क्लोदिंग कंपनी असलेल्या शीनने एक फॅशन शो केला होता. माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. यांसदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्या फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठीच मला पॅरिसला बोलवण्यात आलं होतं. माझे तिकिट्स बिजनेस क्लाससाठी बुक करण्यात आले होते आणि मला राहण्यासाठी एक हॉटेलही बुक करण्यात आलं होतं.'
रिया यासंदर्भात बोलताना म्हणाली की, 'मी पॅरिसला जाणार असल्याचं सुशांतला जेव्हा समजलं तेव्हा सुशांतने विचार केला की, आपण युरोप टूर केली पाहिजे. मी कधीच सुशांतच्या पैशांचा वापर केला नाही. तर मी आणि सुशांत पार्टनर म्हणून एकमेकांसोबत राहत होतो.' अभिनेत्री रियाने तिच्यावर युरोप टूरवरून करण्यात येणारे सर्व आरोप चुकीचे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत.
कुटुंबियांशी सतत संपर्कात होता सुशांत
रियाने सुशांत संदर्भात बोलताना सांगितले की, 'सुशांत गेल्या जून महिन्यापासून आपल्या बहिणी आणि वडिलांसोबत सतत संपर्कात होता. सुशांत त्यांना सांगत होता की, 'मी कूर्गमध्ये शिफ्ट होण्याचा प्लान करत आहे. तुमच्यापैकी कोणी माझ्यासोबत येणार का? मला मदत करणार का? परंतु, कुटुंबियांकडून सुशांतला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.' रियाने पुढे बोलताना सांगितले की, 'सुशांतने मला फायनली 8 तू तुझ्या घरी जा. त्यावेळी मी त्याला सांगितलं की, तू म्हणतोस तर मी माझ्या घरी जाते. पण त्यासाठी माझी एकच अट आहे की, तुझी बहिणी जी मुंबईत राहते, मीतू तिने इथे तुझ्यासोबत यावं. मगच मी इथून जाईल.'
सुशांतच्या कुटुंबियांसोबतम माझं नातं खास नव्हतं : रिया चक्रवर्ती
रिया चक्रवर्तीने सांगितलं की, 'माझे आणि सुशांतच्या कुटुंबियांचे संबंध फारसे चांगले नव्हते. सुशांतने मला सांगितलं की, दीदी एक किंवा दोन तासांत इथे येईल. तुला ती येण्याआधी येथून जावं लागेल. आता तर हे स्पष्ट झालं आहे की, मी त्यांना अजिबातच आवडत नव्हते. जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन किंवा कोणत्याही हेल्थ प्रॉब्लेममधून जात असेल, तर त्याच्या कुटुंबियांचं त्याच्यासोबत असणं आवश्यक असतं. ही गोष्ट मला समजते आणि कळतेही. त्यामुळे मला असं वाटतं होतं की, त्याच्यासोबत त्याच्या बहिणीने असावं.'
पाहा व्हिडीओ : रियाचा भाऊ शोविकची सीबीआयकडून काल आठ तास चौकशी; आज रियाचा नंबर?
कंगनाच्या आरोपावरही रियाचं स्पष्टीकरण
अभिनेत्री कंगना रणौत सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर टिका करत आहे. तिने रियावरही अनेक मोठे आरोप केले आहेत. यासंदर्भात बोलताना कंगनाच्या वक्यव्यावर रियाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रिया म्हणाली की, सिस्टमॅटिक ब्रेक डाऊन सुशांतसोबत झालं असेल तर मग माझ्यासोबत काय झालं? सुशांतचं डिप्रेशन त्याच्यासाठीही एक मोठं आवाहन होतं. त्याला अनेकदा पॅनिक अटॅक येत होते.' अशातच रियाने कंगनाला प्रश्न विचारला आहे की, या परिस्थितीला काय म्हणावं?
ते 17 कोटी कुठे आहेत?
पैशांबाबत रियाला विचारल्यावर रिया म्हणाली की, 'ते 17 कोटी कुठे आहेत? जे माझ्या बँक अकाउंटमध्ये दिसायला पाहिजेत. मुंबई पोलिसांनी माझी चौकशी करत जबाब नोंदवला आहे. तसेच ईडीकडूनही माझी चौकशी करण्यात आली आहे. आता सीबीआयकडूनही चौकशी होणार आहे. आता असं ऐकायला मिळत आहे की, एनसीबी देखील चौकशी करणार आहे. तसेच मी सर्वांना कोऑपरेट करणार आहे.'
विश्वासच होत नाही की, सुशांत आता इथे नाही : रिया चक्रवर्ती
रिया म्हणाली की, मला विश्वासच होत नाही की, सुशांत आता इथे नाही. सुशांत आता सगळं खरं सांगू शकत नाही. मला तर आता फक्त एक नॉर्मल दिवस पाहायचा आहे. मी लढणार. सध्या जे सुरु आहे ते माझी हिम्मत तोडण्यासाठी पूर्ण षडयंत्र आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :
- CBI Summons Rhea: सीबीआयकडून रियाला समन्स, आज होणार चौकशी
- SSR Case | रिया... ड्रग्स... आणि अंडरवर्ल्ड; केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो टीम मुंबईत दाखल
- 'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा आरोप
- SSR Case | रिया-संदीप फिरतायत नावाजलेल्या गीतकाराच्या गाडीतून?
- SSR Suicide Case | संदीप सिंग तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता?
- ...तर बॉलिवूडचे सगळे बडे स्टार्स तुरुंगात जातील, बॉलिवूड नावाचं 'गटार' स्वच्छ करण्याची कंगनाची मागणी