(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर बॉलिवूडचे सगळे बडे स्टार्स तुरुंगात जातील, बॉलिवूड नावाचं 'गटार' स्वच्छ करण्याची कंगनाची मागणी
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थाचे संदर्भ आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कंगनाने आपल्या या ट्वीटमधून आघाडीच्या सर्व कलाकारांकडे संशयाची सुई रोखली आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूतचा तपास आता अत्यंत गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. नेपोटिझमकडून सुरू झालेला हा प्रवास आता अमली पदार्थाच्या सेवनापर्यंत आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ईडीसोबत नार्कोटिक्स डिपार्टमेंटही सामील झालं आहे. या प्रकरणात रियाचे मेसेज आता बाहेर येऊ लागले आहेत. असं असतानाच अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या टीमकरवी ट्विटरवर तिने बॉलिवूडला गटार असं संबोधलं आहे. ती म्हणते, या प्रकरणात आता नार्कोटिक्स डिपार्टमेंट सहभागी झालं आहे. त्यामुळे यात बॉलिवूडचे बरेच ए लिस्टर कलाकार सापडतील.
बॉलिवूड आणि अमली पदार्थ याचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहेच. पण सुशांतच्या प्रकरणानंतर हे संबंध आता उघड होऊ लागले आहेत. रियाने केलेले मेसेज, त्यातले अमली पदार्थाचे उल्लेख आता सगळ्या जगाला कळले आहेत. ईडीने आर्थिक फसवणुकीसाठी रियाचे जुने मेसेज काढले तर त्यात अमली पदार्थांबद्दल संभाषण आढळून आलं. त्यामुळे यात नार्कोटिक्स विभागही समाविष्ट केला गेला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. ती म्हणते, जर यात नार्कोटिक्स ब्युरो येत असेल तर बरेच अ दर्जाचे कलाकार तुरुंगाआड जाणार आहेत. जर अनेकांचे रक्ताचे नमुने घेतले तर बरेच धक्कादायक निकाल समोर येतील. पीएमओ यांनी जे स्वच्छ भारत अभियान चालवलं आहे, त्याअंतर्गत बॉलिवूड नामक गटारही यातून साफ होईल.
If narcotics Control Bureau enters Bullywood, many A listers will be behind bars, if blood tests are conducted many shocking revelations will happen. Hope @PMOIndia under swatchh Bharat mission cleanses the gutter called Bullywood.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 26, 2020
कंगनाने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कंगनाने सुरूवातीपासूनच सुशांतने आत्महत्या केली नसून ती हत्या असण्याचं समर्थन केलं होतं. नेपोटिझमपासून त्याला कसं मानसिक नैराश्यात ढकललं गेलं याबद्दलही ती बोलली. तिने या दरम्यान अनेक कलाकारांची नावं घेतली होती. आता सुशांतचं हे प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे. यात अमली पदार्थाचे संदर्भ आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कंगनाने आपल्या या ट्वीटमधून आघाडीच्या सर्व कलाकारांकडे संशयाची सुई रोखली आहे.
- 'आता हात जियाच्या गळ्यात', महेश भट्ट यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुन्हा ट्रोलर्सचं आक्रमण
- तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात, रिया-महेश भट्ट यांच्यातले मेसेज उघड
- सुशांत सिंह राजपूतची वार्षिक मिळकत होती 30 ते 35 कोटी रुपये!
- SSR Case: शेजारी राहणाऱ्या महिलेचा दावा, 'त्या' दिवशी सुशांतच्या फ्लॅटमध्ये पार्टी झालीच नाही