एक्स्प्लोर
SSR Case | रिया-संदीप फिरतायत नावाजलेल्या गीतकाराच्या गाडीतून?
रिया आणि संदीप सिंग यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतलं एक गीतकार खानदान पाठिंबा देत असल्याची नवीन माहिती समोर आली आहे.
रिया चक्रवर्तीविरोधात अखेर नार्कोटिक्स डिपार्टमेंटने केस दाखल केली आहे. ईडी रियाच्या वडिलांची चौकशी करत आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आता सीबीआय, ईडी आणि नार्कोटिक्स ब्युरो अशा तीन संस्था सहभागी झाल्या आहेत. पण आता मिळालेल्या नव्या बातमीनुसार रिया आणि संदीप सिंग यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतलं एक गीतकार खानदान पाठिंबा देत असलेलं दिसतं.
अनेकांना आता ही गोष्ट कळली आहे. रिया ज्यावेळी ईडीच्या चौकशीसाठी बाहेर पडली तेव्हा तिच्या गाडीमध्ये संदीप सिंग असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर रियाचं ईडीमध्ये जाणं असो किंवा ती चॅनलवरच्या मुलाखतीला जात असो, या सगळ्या जाण्यायेण्यासाठी तिने जी गाडी वापरली आहे ती गाडी हिंदी इंडस्ट्रीमधल्या एका मोठ्या गीतकाराच्या कुटुंबाची असल्याचं कळतं. हा गीतकार शायर आहे. मोठा लेखक आहे. त्यांनी पटकथा संवादही लिहिले आहेत. रिया आणि संदीप इतर कुठे जाताना त्या गीतकाराची गाडी का वापरतायत आणि तो गीतकार या दोघांना आपली गाडी का देतोय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा आरोप
मिळालेल्या माहीतीनुसार रिया आजही मुलाखतीसाठी जाणार आहे. त्यावेळीही ती याच गाडीतून जाणार असल्याचं बोललं जातं. गीतकाराचं हे कुटुंबीय रियाच्या निकटचं म्हणून ओळखलं जात असल्याचं बोललं जातं. विशेष बाब अशी की ईडीच्या चौकशीवेळी रियाने जी गाडी वापरली तीच गाडी आत्ता संदीप सिंह वापरतो आहे. ती गाडी याच गीतकाराच्या फॅमिलीची असल्याचं लक्षात आलं आहे. संदीप आज आत्ता त्याच गाडीतून बाहेर पडला आहे.
या घडामोडी घडत असताना यावर अधिकृत मात्र कोणीच काही बोलताना दिसत नाहीय. यातलं सत्यासत्यता समोर येईलच.
Sushant Singh Case | सुशांत आत्महत्या प्रकरणी CBIकडून एकाच वेळी सहा जणांची चौकशी सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement