एक्स्प्लोर
हृतिकसोबतच्या वाढत्या जवळीकतेबाबत सुझान म्हणते...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या वाढत्या जवळीकतेनंतर, सुरु झालेल्या चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न हृतिकची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने केला आहे.
सुझानने याबाबत ट्विट करुन हृतिक आणि आपल्याबाबत तर्कवितर्क लढवण्याचं बंद करा, असं आवाहन केलं आहे.
"लोकांनी कृपया तर्कवितर्क लढवणं बंद करावं, अशी माझी विनंती आहे. हृतिकशी पुन्हा जवळीक होणार नाही. पण आम्ही नेहमी चांगले पालक राहू, आणि त्यालाच प्राधान्य असेल" असं ट्विट सुझानने केलं आहे.
सध्या हृतिक रोशन आणि कंगना रानौत यांच्यात कायदेशीर लढाई सुरु आहे. मात्र या लढाईदरम्यान हृतिकला त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने पाठिंबा दिला आहे. तसंच नुकतंच हृतिक-सुझानचा मुलगा रिधानच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे एकत्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर हृतिक आणि सुझान खान यांच्यातील वाढत्या जवळीकीबद्दल वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. तसेच अनेकदा सुझानला याबद्दल विचारलंही जात होतं. शेवटी सुझैनने वैतागून ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. हृतिक- सुझानचा काडीमोड परस्परातील मतभेदांमुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझानच्या वैवाहिक आयुष्याचा काडीमोड झाला. हृतिक आणि सुझानचे गेल्या 17 वर्षांपासूनचे संबंध संपुष्टात आले आहेत. कहो ना प्यार है या चित्रपटानंतर, हृतिक - सुझानचा 20 डिसेंबर 2000 रोजी विवाह झाला होता. त्यांना रेहान (7) आणि रिधान (5) अशी दोन मुलं आहेत.I request people to stop speculating. There will never be a reconciliation with @iHrithik. But we will always be good parents. #no1priority
— Sussanne Khan (@sussannekroshan) May 2, 2016
संबंधित बातम्या
अखेर हृतिक रोशन - सुझान खानचा घटस्फोट !
बिझी हृतिककडे घटस्फोट घेण्यासही वेळ नाही!
पोटगीच्या बातमीबाबत हृतिकचा संताप, 400 कोटीच्या पोटगीचं
PHOTO:
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच हृतिक- सुझान एकत्र दिसले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement