एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माधुरीला ‘मुजरा’ शिकवण्यासाठी रेमो आणि सरोज खान एकत्र
‘एक.. दो.. तीन..’ (तेजाब), ‘धक धक’ (बेटा), ‘चोली के पिछे क्या है’ (खलनायक) यांसारख्या अनेक गाण्यांवरील डान्स माधुरीला सरोज खान यांनी शिकवलं आहे. ही जोडी आता चार वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे.
मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षितला 'मुजरा' शिकवण्यासाठी सरोज खान आणि रेमो डिसोजा एकत्र येणार आहेत. अभिषेक वर्मन यांच्या आगामी ‘कलंक’ सिनेमासाठी माधुरी दीक्षित ‘मुजरा’ नृत्य करणार आहे. पुढील महिन्यात या गाण्याची शूटिंग सुरु होणार आहे.
सरोज खान हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्यांच्यासोबत रेमो डिसोजा काम करणार आहे. या निमित्ताने दोन मोठे नृत्य दिग्दर्शक पहिल्यांदाच एकत्र येतील.
‘एक.. दो.. तीन..’ (तेजाब), ‘धक धक’ (बेटा), ‘चोली के पिछे क्या है’ (खलनायक) यांसारख्या अनेक गाण्यांवरील डान्स माधुरीला सरोज खान यांनी शिकवलं आहे. ही जोडी आता चार वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे.
माधुरीने रेमो आणि सरोज खान यांच्यासोबत डान्सच्या सरावाला चार दिवसांपासून सुरुवातही केली आहे.
सरोज काय म्हणाल्या?
“आम्ही डान्सच्या सरावाची सुरुवात चार दिवसांपूर्वीच केली आहे. मी रेमोसोबत या डान्ससाठी नृत्य दिग्दर्शन करत आहे. या गाण्यावरील डान्सही आधी ज्याप्रकारे माधुरीसोबत मी काम केलंय, त्या गाण्यांची आठवण करुन देईल. 5, 6 आणि 7 सप्टेंबर या तीन दिवसात डान्स शूट होईल.” अशी माहिती सरोज खान यांनी केली.
बडे निर्माते, तगडी स्टारकास्ट
अभिषेक वर्मन दिग्दर्शित करत असलेला ‘कलंक’ सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओज, धर्मा प्रॉडक्शन्स, नाडिडवाला ग्रँडसन निर्मिती करणार आहेत. आलिया भट, वरुण धवन, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा ही कलाकार मंडळी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
भारत
निवडणूक
Advertisement