एक्स्प्लोर

Priya Gill: 'सिर्फ तुम'ची आरती सध्या काय करते? सौंदर्यात ऐश्वर्यालाही टक्कर देणारी प्रिया गिल कुठे गायब?

'Sirf Tum' Actress Priya Gill: प्रिया गिलला लोक अजूनही तिच्या 'सिर्फ तुम' चित्रपटातील आरतीच्या भूमिकेसाठीच ओळखतात आणि लक्षात ठेवतात.

मुंबई : 'सिर्फ तुम' चित्रपटातील आरती आठवतेय का? तीच जी कधीही पाहिलं नसलेल्या दीपकच्या प्रेमात वेडी होते, त्याला शोधायला मुंबईला येते... 'जिंदा रहने के लिये तेरी कसम, इक मुलाखात जरुरी है सनम' असं म्हणणारी आरती जेव्हा दीपकच्या शोधात कावरीबावरी होते तो क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाचं काळीज हेलावतं. बॉलिवूड अभिनेत्री प्रिया गिलने 'सिर्फ तुम' (Sirf Tum Actress Priya Gill) चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अशी काही छाप सोडली की ती आजही त्याच चित्रपटासाठी ओळखली जाते. पण सौंदर्याच्या बाबतीत एकेकाळी ऐश्वर्यालाही टक्कर देणारी प्रिया गिल सध्या काय करते? प्रिया गिल चित्रपटांपासून दूर आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. 

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या भलेही चित्रपटांपासून दूर असतील, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांशी कनेक्ट राहिल्या आहेत. तर दुसरीकडे अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वत:ला चित्रपटांपासून आणि या झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवलं आहे. त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय नाहीत. प्रिया गिल ही त्यापैकीच एक अभिनेत्री. प्रिया गिलला लोक अजूनही तिच्या 'सिर्फ तुम' चित्रपटासाठी ओळखतात आणि लक्षात ठेवतात.

Priya Gill: पहिला चित्रपट अयशस्वी, पण सौंदर्याची प्रशंसा 

प्रिया मुख्यतः हिंदी चित्रपटांसह पंजाबी, मल्याळम, तामिळ, भोजपुरी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती 'मिस इंडिया 1995' मध्ये सेकंड रनरअप देखील होती. प्रियाने 1996 मध्ये 'तेरे मेरे सपने' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अर्शद वारसी आणि चंद्रचूड सिंह यांसारखे दिग्गज कलाकार होते. परंतु तिचा हा पहिला चित्रपट फारसा चालला नाही.

प्रियाचा पहिला चित्रपट चालला नसेल, पण तिच्या सौंदर्याची सर्वत्र प्रशंसा झाली आणि याच दरम्यान तिला 'सिर्फ तुम' हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट 1999 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती संजय कपूरसोबत दिसली होती.

Sirf Tum Actress Priya Gill: 'सिर्फ तुम'च्या आरतीनं केलं काळजात घर

'सिर्फ तुम' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यासोबतच अभिनेत्री प्रिया गिल देशभरात प्रसिद्ध झाली. या चित्रपटानंतर प्रियाची जबरदस्त लोकप्रियता पाहायला मिळाली. सिर्फ तुम नंतर ती 'जोश' (2000) आणि 'रेड' (2002) यासारख्या चित्रपटात दिसली. सौंदर्यात तिची ऐश्वर्या रॉयशी तुलना केली जात होती. पण 'सिर्फ तुम'नंतर प्रियाचा कोणताही चित्रपट कमाल करू शकला नाही.

नंतरच्या काळात प्रिया गिल ही अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही दिसली, पण तिथेही तिला यश मिळाले नाही. अखेर तिने चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या 17 वर्षांपासून ती कुठे गेली हे अनेकांना माहिती नाही.  प्रिया आता देश सोडून डेन्मार्कमध्ये स्थायिक झाली आहे आणि तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करतेय. 

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget