Rekha : रेखासोबत पहिल्याच चित्रपटात इंटीमेट सीन, टीव्हीवरील अमिताभ म्हटल्यावर व्हायचा नाराज; कोण आहे हा अभिनेता?
Rekha : रेखासोबत पहिल्याच चित्रपटात इंटीमेट सीन दिल्याने बॉलिवूडचा एक अभिनेता चांगलाच चर्चेत आला होता. छोट्या पडद्यावरील अमिताभ बच्चन अशी त्याची ओळख आहे.
Rekha : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री अशी रेखा (Rekha) यांची ओळख आहे. दिलकश अदा, टाइमलेस ब्यूटीमुळे ती ओळखली जाते. आजही रेखाच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री असणाऱ्या रेखासोबत पहिल्याच चित्रपटात इंटीमेट सीन दिल्याने बॉलिवूडचा एक अभिनेता (Bollywood Actor) चांगलाच चर्चेत आला होता. छोट्या पडद्यावरील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अशी त्याची ओळख होती. पण छोट्या पडद्यावरील अमिताभ बच्चन म्हटलेलं त्याला आवडत नसे.
अभिनेत्री रेखाने छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे राज्य केलं आहे. अभिनेत्याची लोकप्रियता पाहून त्याला छोट्या पडद्यावरील अमिताभ बच्चन असे म्हटले जायचे. पण अभिनेत्याला मात्र अमिताभ बच्चन असं म्हटलेलं आवडत नव्हतं. अभिनेत्याने 1984 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्याला काहीही संघर्ष न करता पहिला चित्रपट मिळाला. अभिनेत्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटात रेखासोबत काम करण्याची संधी मिळाली. करिअरच्या सुरुवातीला त्याने डिंपल कपाडिया आणि पद्मिनी कोल्हापुरीसारख्या बड्या अभिनेत्रींसोबत काम केलं. शशी कपूर यांनी त्याला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. करिअरची सुरुवात खूप उत्तम झाली. पण 1989 नंतर तो बेरोजगार झाला.
रेखासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण
टीव्ही विश्वात अमिताभ बच्चन म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'हीरामंडी' (Heeramandi) या वेबसीरिजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला शेखर सुमन (Shekhar Suman) आहे. शेखर सुमनने अभिनयक्षेत्रात पदार्पण करताच रेखासोबत 'उत्सव' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून तिला वेगळी ओळख मिळाली. पुढे शेखर सुमनला अनेक चांगल्या चित्रपटांसाठी विचारणा झाली. चित्रपटांसह टीव्हीविश्वातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेखर सुमनने आपल्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. एकेकाळी चित्रपटांपासून दुरावलेला शेखर सुमनने छोट्या पडद्यावर वेगळी ओळख निर्माण करू लागला.
शेखर सुमनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याला छोट्या पडद्यावरील अमिताभ बच्चन असे म्हटले जायचे. अमिताभ बच्चन म्हणून दिलेली ओळख त्याला आवडत नव्हती. पण आज मात्र त्याला या गोष्टीचा पश्चाताप होतो. त्यावेळी दिलेली काम्प्लिमेंट त्याला समजता आली नाही. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमनने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला. करिअरच्या सुरुवातीला त्याने रेखा, माधुरी दीक्षित, डिंपल कपाडियासारख्या अभिनेत्रींसोबत काम केलं. पण 1989 नंतर तो पूर्णपणे बेरोजगार झाला होता.
'हीरामंडी'तून कमबॅक
शेखर सुमन संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये नवाब हे पात्र साकारत आहे. अभिनेत्याची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक दिवसांनी 'हीरामंडी'सारख्या दमदार सीरिजच्या माध्यमातून शेखर सुमनने कमबॅक केलं आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज झालेली आहे. या सीरिजमध्ये शेखर सुमनसोबत त्याचा मुलगा अध्ययन सुमनदेखील दिसत आहे.
संबंधित बातम्या