एक्स्प्लोर
VIDEO : ...आणि बिग बी यांचा फोटो पाहून रेखा यांनी तोंड फिरवलं!
जेव्हा रेखा या कार्यक्रमाला पोहोचल्या त्यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांना कॅलेंडरमधील फोटोंना पाहताना पोझ देण्याची विनंती केली.
मुंबई : बॉलिवूडच्या एखाद्या इव्हेंटमध्ये जेव्हा महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या आठवणी ताज्या होतात. परंतु एकमेकांसमोर येऊ नये यासाठी दोन्ही कलाकार पूरेपूर प्रयत्न करतात. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडर इव्हेंटदरम्यान रेखा यांची रिअॅक्शन पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
सिलेब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी दरवर्षी कॅलेंडर लॉन्च करतो. बॉलिवूडच्या टॉप कलाकारांच्या फोटोंसह नव्या वर्षाचं कॅलेंडर बनवतो. त्याचं हे कॅलेंडर कायमच चर्चेत असतं. डब्बू रतनानीने मुंबईत सोमवारी आपलं कॅलेंडर लॉन्च केलं. यानिमित्ताने रेखा यांच्यासह बॉलिवूडच्या तमाम कलाकारांनी हजेरी लावली होती.
जेव्हा रेखा या कार्यक्रमाला पोहोचल्या त्यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांना कॅलेंडरमधील फोटोंना पाहताना पोझ देण्याची विनंती केली. रेखा फोटोग्राफरच्या विनंतीला होकार दिला. पण मागे वळताच त्यांना अमिताभ बच्चन यांचा फोटो दिसला.
बिग बी यांचा फोटो पाहताच रेखांच्या हालचाली वेगाने वाढल्या. रेखा तिथे थांबून पोझ देणार होत्या. परंतु अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून त्यांनी तोंड फिरवलं आणि तिथून निघून गेल्या. रेखा यांची रिअॅक्शन पाहून फोटोग्राफर्स जोरात हसू लागले.
रेखा यांची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. परंतु त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक्स बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्डला पाहून एखाद्याची प्रतिक्रिया कशी असेल, हेच रेखा यांनी दाखवलं, अशा कमेंटही लोकांनी केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement