Raveena Tondon : रवीना टंडनच्या 'Karmma Calling'चा टीझर आऊट; दमदार भूमिकेत करणार ओटीटीवर पदार्पण
Karmma Calling : अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveena Tondon) 'कर्मा कॉलिंग' या वेबसीरिजचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे.
Karmma Calling Teaser Out : रवीना टंडन (Raveena Tondon) 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर रवीनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रवीनाचा 'कर्मा कॉलिंग' (Karma Calling) ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करत आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर आऊट झाला आहे.
रवीनाने शेअर केला 'कर्मा कॉलिंग'चा टीझर
अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या आगामी 'कर्मा कॉलिंग' या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने लिहिलं आहे,"जसं काम कराल तसचं फळ मिळेल? कर्माला येऊद्या मी सांभाळून घेईल".
View this post on Instagram
'कर्मा कॉलिंग'चा टीझर खूपच दमदार आहे. या टीझरमध्ये रवीना टंडन म्हणत आहे,"यश मिळवण्यासाठी काही नियम नसतात. योग्य-अयोग्य असं काही नसतं. तुमची तत्तवे, आदर्श आणि तुमचे कुटुंबही..सर्व गेलं उडत. तुम्ही जसं काम कराल तसं तुम्हाला फळ मिळेल, असं लोक म्हणतात. पण जग तुमच्या पायाशी असेल तर कर्मही काही करू शकत नाही, असं माझं मत आहे".
'कर्मा कॉलिंग' या सीरिजमध्ये रवीना टंडन पावरफुल महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्रीचा लूक खूपच कमाल आहे. नेहमीप्रमाणे या सीरिजच्या टीझरमधून रवीनाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
'कर्मा कॉलिंग' कधी होणार रिलीज? (Karmma Calling Relase Date)
'कर्मा कॉलिंग' या सीरिजमध्ये श्रीमंतांचे वास्तव दाखवण्यात आले आहे. या सीरिजमध्ये रवीनाने इंद्राणी कोठारी हे पात्र साकारलं आहे. हे ग्लॅमरस जग किती फसवं आहे हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. 26 जानेवारी 2023 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'कर्मा कॉलिंग' या सीरिजमध्ये रवीना टंडनला ग्लॅमरस लूक पाहायला मिळणार आहे. आरएटी फिल्म्सने या सीरिजची निर्मिती केली आहे. तर रुची नारायणने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'रिवेंज' या ओरिजनल सीरिजवर ही सीरिज आधारित आहे. या सीरिजबद्दल बोलताना रवीना टंडन म्हणाली,"अनेक वर्षांनी मी अशा पद्धतीची भूमिका साकारत आहे. इंद्राणी कोठारीचे पात्र मी साकारत आहे. या पात्राने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत".
संबंधित बातम्या