एक्स्प्लोर

Ranveer Singh: रणबीरचं रॅप अन् चाहत्यांची नाराजी, व्हिडीओवर कमेंट्स करुन रणवीरला केलं जातंय ट्रोल

अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या (NBA) कार्यक्रमाच्या दरम्यान सादर केलेल्या रॅपवर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

Ranveer Singh: उटाह सॉल्ट लेक सिटीमध्ये (Utah's Salt Lake City) एनबीए ऑल स्टार गेमसाठी (NBA All Star game) उपस्थिती लावली असताना अभिनेता रणवीर सिंहने असं काही केलं की ज्यामुळे चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलंय. रणवीर सिंह एनबीए खेळासाठी भारताचं प्रतिनिधित्व करत असून नुकतंच त्याने एनबीए स्टार हॉलिवूड अभिनेता सिमू लिऊ (Simu Liu) आणि टीव्ही होस्ट कॉमेडियन हसन मिन्हाज (Hasan Minhaj) यांच्यासोबत सहभाग नोंदवला. परंतु या खेळामुळे नव्हे तर रणवीर सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

हसन मिन्हाजने लॉकर रूममधील एक व्हिडिओ रविवारी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये 'गली बॉय' स्टार रणवीर सिंह, हॉलिवूड अभिनेता सिमू लिऊ, गायक-अभिनेता निकी जाम (Nicky Jam)आणि रॅपर 21 सॅवेज (21Savage) यांच्यासमोर रॅप करताना दिसत आहे. रणवीरने जोया अख्तर दिग्दर्शित 2019 च्या गली बॉय या चित्रपटात रॅपरची भूमिका साकारली होती. व्हिडीओच्या सुरुवातीला हसन मिन्हाजने रणवीरची स्तुती करत त्याचे स्वागत केलं. त्यानंतर रणवीरने पुढे येऊन रॅप करण्यास सुरूवात केली. त्याने आपल्या रॅपमध्ये  21 सॅवेज , निकी जाम, सिमू लिऊ यांचा उल्लेख केला आहे. 

"आमच्याविरुद्ध जाल तर तुम्हाला महागात पडेल. आम्ही 21 वर्षाचे नसलो तरी सर्वजण सॅवेज आहोत. माझ्या मुव्ह्ज पाहा, किती फॅन्सी आहेत. जगभरात मला शांग-ची म्हणून ओळखतात. मी जगातील सर्वोत्तम लॅटिन कलाकार निकी जॅम आहे." असं रॅप रणवीर सिंह यांने केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Hasan Minhaj (@hasanminhaj)

हा रॅप ऐकल्यानंतर काहीच वेळात चाहत्यांनी रणवीर सिंहच्या रॅपिंग आणि 'गली बॉय अॅक्ट'बद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. अगदी लाजिरवाणे रॅप केल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त केल्या आहेत. एकजण म्हणतो की, रणवीरच्या प्रत्येक वाक्यातून भारतीय जगाच्या मागे असल्याचा संदेश जातोय. तर  दुसर्‍याने लिहिलं आहे की 'एफ वन ते प्रीमियर लीगपर्यंत, हा माणूस आपल्या प्रत्येक भारतीयाला मान खाली घालायला लावतोय'. या दरम्यान सिमू लिऊ 'खूप अस्वस्थ' दिसत असल्याचं एका यूजरने लिहिलं आहे. तर एका युजरने रणवीरवर टीका करत लिहिलं आहे की, 'रणवीरचा स्वभाव असा कधीच नव्हता, पण तो असा का वागतोय?' 

रणवीर सिंगने त्याच्या उटाह टूरमधील अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने एनबीए लेजंड ट्रेसी मॅकग्रेडी (Tracy McGrady), कार्ल मालोन (Karl Malone),शाकिल ओ'नील (Shaquille O'Neal),तसेच अभिनेता जोनाथन मेजर्स (Jonathan Majors),मायकेल जॉर्डन (Michael Jordan), सिमू लिऊ आणि चित्रपट निर्माता स्पाइक ली (Spike Lee) यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. एनबीए इंडियाच्या इंस्टाग्रामवरही ऑल-स्टार गेममधील रणवीर सिंगच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget