Amruta Khanvilkar: जेव्हा रणवीर सिंह अमृताला म्हणातो,'तू स्पेशल आहेस'; अभिनेत्रीनं शेअर केली पोस्ट
रणवीर सिंहनं (Ranveer Singh) अमृताची (Amruta Khanvilkar) पोस्ट रिपोस्ट करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे.
Amruta Khanvilkar: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. काही दिवसांपूर्वी अमृतानं रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट आता रणवीर सिंहनं (Ranveer Singh) रिपोस्ट करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे.
अमृतानं रणवीर रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं आलिया भट्ट, करण जोहर आणि रणवीर सिंहला टॅग केलं होतं. अमृताची ही पोस्ट रणवीरनं रिपोस्ट केली. अमृताची पोस्ट रिपोस्ट करुन रणवीरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अमृता तू स्पेशल आहेस. नेहमीच प्रेम आणि पॉझिटिव्ह एनर्जी दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो.'
अमृतानं व्हॉट झुमका गाण्यावर केला डान्स
अमृता खानविलकरनं रणवीर आणि आलिया यांच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील व्हॉट झुमका या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ देखील काही दिवसांपूर्वी शेअर केला. या व्हिडीओला अमृतानं कॅप्शन दिलं, 'हे रणवीर सिंह, आलिया आणि करण जोहर यांच्यासाठी' अमृताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
अभिनेता रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रंधावा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
अमृता खानविलवकरचे चित्रपट
अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटमधील चंद्रा गाण्यावरील अमृताच्या लावणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं. तसेच तिनं मलंग आणि राझी या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अमृताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :