एक्स्प्लोर
कंडोमची जाहिरात न करण्याचा रणवीर सिंगचा निर्णय
विवाहबंधनात अडकल्यामुळे रणवीरने हा करार रद्द केल्याचं म्हटलं जात आहे. काही ठिकाणी मात्र रणवीरने मानधन वाढवून मागितल्यामुळे बोलणी फिस्कटल्याच्या चर्चा आहेत.
मुंबई : कंडोमची जाहिरात न करण्याचा निर्णय अभिनेता रणवीर सिंहने घेतल्याची माहिती आहे. विवाहबंधनात अडकल्यामुळे रणवीरने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
कंडोम, सेक्स एज्युकेशन यासारखे विषय आपल्या समाजात निषिद्ध मानले जातात. रणवीर सिंगसारख्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याने पाच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध कंडोम ब्रँडसोबत टाय-अप केलं होतं. सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जनजागृती करण्यासाठी रणवीर ड्यूरेक्सचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला, मात्र रणवीरसोबतचा हा करार आता मोडित निघाला आहे.
रणवीरसोबतचा करार न वाढवण्याचा निर्णय 'ड्युरेक्स'ने घेतल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. विवाहबंधनात अडकल्यामुळे रणवीरसोबतचा हा करार रद्द झाल्याचं म्हटलं जात आहे. काही ठिकाणी मात्र रणवीरने मानधन वाढवून मागितल्यामुळे बोलणी फिस्कटल्याच्या चर्चा आहेत.
रणवीर-दीपिका गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यावेळी 'ड्युरेक्स'च्या ट्विटर हँडलवरुन दोघांना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या.
2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रणवीरने मी नेहमीच पाकिटात कंडोम ठेवतो, असं म्हटलं होतं. त्याचवेळी हे प्रॉडक्ट प्रमोट करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला होता.
'एचआयव्ही, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, नकोशी गर्भधारणा यासारखे प्रश्न आपल्या देशात आहेत. जर एखादं उत्पादन आपण प्रमोट करण्याची गरज असेल, तर ते म्हणजे कंडोम' असं रणवीर म्हणाला होता.We've got you covered. ;) #DeepVeer #DeepVeerKiShaadi pic.twitter.com/eRL4MnSEXC
— Durex India (@DurexIndia) November 14, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement