Ranveer Singh Deepika Padukone : 'दीपवीर' चिमुकल्याचं स्वागत दणक्यात करणार! बाळाच्या जन्मानंतर 119 कोटींच्या घरात जाणार, नेटकरी म्हणाले...
Ranveer Singh Deepika Padukone : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे लवकरच आई-बाबा होणार आहे. त्याआधी या दोघांकडून खास तयारी केली जात आहे.
Ranveer Singh Deepika Padukone : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे लवकरच आई-बाबा होणार आहे. त्याआधी या दोघांकडून खास तयारी केली जात आहे. या दोघांच्या 100 कोटींहून अधिक किंमतीच्या नव्या घराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या या इमारतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही इमारत शाहरुख खानच्या घर 'मन्नत'च्या अगदी जवळ आहे. हा भाग मुंबईतील सर्वात पॉश आणि महागडा म्हणून ओळखला जातो.
रणवीर आणि दीपिकाने दोन वर्षांपूर्वी या इमारतीत अपार्टमेंट बुक केले होते. तेव्हापासून घराचे काम सुरू होते. आता, दीपिका-रणवीर हे सप्टेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. त्यामुळे बाळासोबत हे दोघेही नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईतील वांद्रे भागात दीपिका-रणवीरने घर खरेदी केले आहे. ही इमारत किंग खानच्या 'मन्नत' या बंगल्याच्या मागील बाजूस आहे. हे प्राइम लोकेशन असून या ठिकाणाहून समुद्राचे नयनरम्य दृष्य दिसते. या इमारतीचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.
पापाराजी विरल भयानी यांनी या बिल्डिंगचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहे. ही सगळी इमारत दीपिका-रणवीर यांची आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. एकाने म्हटले की फक्त 3 लोकांसाठी ही सगळी बिल्डिंग? आता, दीपवीरचे शेजारी शाहरुख असणार असल्याचेही एका नेटकऱ्याने म्हटले.
View this post on Instagram
रणवीर-दीपिकाने खरेदी केले चार मजले
रणवीर-दीपिका यांनी या घरासाठी 119 कोटी मोजले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठी चर्चा झाली. घर खरेदीमधील सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक व्यवहार समजला जातो. रणवीर-दीपिका यांनी 16,17,18 आणि 19 मजले खरेदी केले आहे. अपार्टमेंटमध्ये एकूण 11, 266 चौफूट चटईक्षेत्र आहे. त्यासोबतच 1300 चौफूटचा एक्सक्लूसिव्ह टेरेस देखील आहे. इमारतीमध्ये 19 पार्किंग स्पेस आहे.
फ्लॅट्समध्ये आहे खास सुविधा...
दीपवीरने अपार्टमेंटसाठी 118.94 कोटी रुपये मोजले आहेत. तसेच नोंदणीसाठी 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. यामुळे टेरेस क्षेत्र वगळून प्रति चौरस फूट दर हा 1.05 लाख रुपये इतका होतो. या अपार्टमेंटमध्ये सुविधाही खूप खास आहेत. एक वैयक्तिक जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट स्पेस देखील आहे. या दोघांच्या प्रोफेशनल लाइफला लक्षात घेता तयार करण्यात आली.