Deepika-Ranveer : लेकीच्या जन्मानंतर दीपिका-रणवीरची पुन्हा एकदा 'आलिशान' खरेदी, कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर ताफ्यात सामील
Deepika-Ranveer Buys New Range Rover: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अगदी नवीन रेंज रोव्हर 4.4 LWB खरेदी केली आहे.
Deepika-Ranveer Buys New Range Rover: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी सप्टेंबर महिन्यांत गोंडस मुलीला जन्म दिला. आई-वडील झाल्यानंतर या जोडप्याने आता एक नवीन कार खरेदी केली आहे. दीपिका आणि रणवीरने करोडो रुपयांची आलिशान रेंज रोव्हर खरेदी केली आहे. विशेष बाब म्हणजे या वाहनाची नंबर प्लेट देखील रणवीर सिंगचा लकी नंबर आहे.
फ्री प्रेस जर्नलनुसार, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी एक नवीन रेंज रोव्हर 4.4 LWB खरेदी केली आहे. त्याची किंमत 4.74 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची नोंदणी 4 ऑक्टोबरलाच पूर्ण झाली. दरम्यान या कारचा नंबर 6969 आहे. हा नंबर असलेली रणवीरची ही चौथी कार आहे.
रेंज रोव्हर 4.4 LWB ची वैशिष्ट्ये
रेंज रोव्हर 4.4 LWB च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या 4.4 L P530 इंजिनमध्ये 434 bhp आणि 700 Nm टॉर्क आहे. 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह एअरबॅग्ज, एबीएस, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स वितरण, सेंट्रल लॉकिंग आणि चाइल्ड सेफ्टी लॉक आहेत. याशिवाय यात टच स्क्रीन डिस्प्ले, सीडी/डीव्हीडी प्लेयर, स्पीकर, रेडिओ, यूएसबी सपोर्ट आणि ब्लूटूथ सपोर्ट सारख्या सुविधा आहेत. 360 डिग्री कॅमेरा आणि 4 झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे.
दीपिका-रणवीर 8 सप्टेंबरला आई-वडील झाले
दीपिका पदुकोणने 8 सप्टेंबरला एका मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रणवीर आणि दीपिकाने ही गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यावेळी करीना कपूर खान ते सारा अली खान यांसारख्या सेलिब्रिटींनीही या जोडप्याचे अभिनंदन केले होते.
दीपिका-रणवीरचा वर्क फ्रंट
वर्क फ्रंटवर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सिंघम अगेनमध्ये एकत्र दिसणार आहेत. आई-वडील झाल्यानंतर ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
रणवीर-दीपिकाने खरेदी केलं नवं घर
मुंबईतील वांद्रे भागात दीपिका-रणवीरने घर खरेदी केले आहे. ही इमारत किंग खानच्या 'मन्नत' या बंगल्याच्या मागील बाजूस आहे. रणवीर-दीपिका यांनी या घरासाठी 119 कोटी मोजले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठी चर्चा झाली. घर खरेदीमधील सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक व्यवहार समजला जातो. रणवीर-दीपिका यांनी 16,17,18 आणि 19 मजले खरेदी केले आहे. अपार्टमेंटमध्ये एकूण 11, 266 चौफूट चटईक्षेत्र आहे. त्यासोबतच 1300 चौफूटचा एक्सक्लूसिव्ह टेरेस देखील आहे. इमारतीमध्ये 19 पार्किंग स्पेस आहे.